Karuna Sharma On Suresh Dhas: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) तपास पथकात काही लोकांची बदली ही वाल्मिक कराड (Walmik Karad) याने केली होती म्हणून आम्ही त्यांची नावे घेतली आहेत. एसआयटीवर आमचा आक्षेप नाही. यातील क्लास थ्रीमधील काही कर्मचाऱ्यांवर आमचा आक्षेप आहे. करुणा शर्मा (मुंडे) (Karuna Sharma Munde) यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारासुध्दा पोलीस दलातील व्यक्ती होता. तो देखील मला माहिती आहे, असं विधान भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केलं होतं. यावर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


करुणा शर्मांनी सुरेश धस यांचे मानले आभार-


आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारे पोलिसच होते, असा दावा केला होता. यावर करुणा शर्मा यांनी त्यांचे आभार मानत गुंडशाहीचा पर्दाफाश करण्याची मागणी त्यांनी आमदार सुरेश धस यांच्याकडे केली. सुरेश धसभाऊ माझ्याकडे खूप पुरावे आहेत, मला तुम्ही वेळ द्या...मी सर्व पुरावे घेऊन तुमच्याकडे येते, असं करुणा शर्मा म्हणाल्या. पिस्तूल ठेवण्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मारहाणीपर्यंतचे पुरावे असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले.



जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?


करुणा मुंडे यांच्यावर ज्या केसेस केल्या त्या सर्व खोट्या होत्या. ⁠पोलिसांना मॅनेज करुन या केसेस टाकण्यात आल्या. पहिल्यादा मी करुणा मुंडे यांच नाव घेतलं, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 


धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद काय आहे?


करुणा शर्मांची बहीण रेणू शर्मा यांनी तीन वर्षांपूर्वी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली. तसेच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली.


संबंधित बातमी:


वाल्मिक कराड सरेंडर, पण सुदर्शन घुले त्यापेक्षा डेंजर; सरपंच हत्येतील मुख्य आरोपी घुले कोण?


Bajrang Sonwane: 'मी प्रेस घेतल्यास खासदाराची...'; सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बजरंग सोनवणे यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट