Javed Akhtar: पाकिस्तानामध्ये (Pakistan) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी हजेरी लावली होती. या कर्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. तसेच पाकिस्तानमधील कार्यक्रमातील व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) जावेद अख्तर यांचे भरभरुन कौतुक केले.
काय म्हणाले जावेद अख्तर
पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर म्हणाले, 'आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर हल्ला कसा झाला? ते आम्ही पाहिले. ते लोक ना नॉर्वेतून आले होते ना इजिप्तमधून आले होते, ते हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत. एखाद्या भारतीयाने याबद्धल छेडलं तर वाईट वाटू देऊ नका.' त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
पुढे ते म्हणाले, 'आम्ही नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तुमच्या देशात तर लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही.'
कंगनानं केलं कौतुक
पाकिस्तानात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ कंगनानं शेअर केला. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'जेव्हा मी जावेद साहेबांची कविता ऐकते तेव्हा मला वाटायचे की, सरस्वतीची त्यांच्यावर कृपा आहे. पण हे लक्षात ठेवा, त्यांच्यामध्ये खरेपणा देखील आहे त्यामुळे देव त्यांच्या पाठिशी आहे. जय हिंद! घर में घुसकर मारा हा हा...'
कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे. कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Kangana Ranaut: दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पडताच कंगना भडकली; 'माफिया' म्हणत शेअर केली पोस्ट