Continues below advertisement

जालना : धनगर समाजाच्या पाठीशी माझे वडील होते, आता मीही शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी राहणार असं आश्वासन राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनगर आंदोलकांना दिलं. तसेच जालन्यात सुरु असलेल्या दीपक बोऱ्हाडे ( Deepak Borhade) यांच्या आंदोलनास्थळीही (Dhangar Reservation Protest) येण्याचं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं. जालन्यामध्ये अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पंकजा मुंडे यांना धनगर आंदोलक भेटले. त्यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलक दीपक बोऱ्हाडे उपोषणाला बसले असून आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धनगर समाजाने जालन्यामध्ये इशारा मोर्चा आयोजित केला आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी या आंदोलकांना आपण धनगर समाजाच्या पाठीशी असल्याचं आश्वासन दिलं.

Continues below advertisement

तुमचा नाही, आपला समाज म्हणा

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे. या संबंधी आंदोलकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी राज्य सरकारकडे द्याव्यात असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. तसेच आपले वडील धनगर समाजाच्या पाठीशी होते, आपणही शेवटपर्यंत समाजाच्या पाठीशी राहणार असल्याचं त्या म्हणाल्या.

जालन्यामध्ये सुरू असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पंकजा मुंडेंनी भेट द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण करा असं यावेळी एका आंदोलकाने म्हटलं. त्यावर बोलताना 'आमचा समाज नाही तर आपला समाज' असं बोला असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनगर समाजाला फसवणाऱ्यांचे घरं जाळून टाका

जालन्यात गेल्या आठ दिवसांपासून धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी या उपोषणाला अँड गुणरत्न सदावर्ते यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांनी उपस्थित असणाऱ्यांना मार्गदर्शन करताना चिथावणीखोर वक्तव्य केलं.

माझा श्वास 24 तारखेपर्यत सुरू राहील. 24 तारखेला धनगर समाजाचा इशारा मोर्चा आहे. या मोर्चानतंर देखील सरकार जागं झालं नाही तर धनगर समाजाला फसवणाऱ्यांचे घरं जाळून टाका असं आवाहन बोऱ्हाडे यांनी केलं. शिवाय 24 तारखेनंतर नेपाळमध्ये झालं नाही त्या पलीकडे महाराष्ट्रात घडवा असंही बोऱ्हाडे म्हणाले.

इंग्रजाच्या काळात जे समुदाय आदिवासी होते त्यांना अठराव्या शतकात क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं. त्या ट्राईब्सला देशात काश्मीरपासून कन्याकुमार पर्यंत शेड्युल ट्राईब संबोधल गेल. त्यामुळे धनग हेर एसटी आहेत. आमच्याकडे गाड्या आल्या, चांगले कपडे घालू लागलो तर म्हणे धनगर मागास कसे? सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे एक निकाल दिला आहे. त्यात स्पष्टपणे लिहलंय की, अनुसूचित जाती, जमातीत जे येतात त्यांच मागासलेपण तपासण्याची गरज नाही असं दीपक बोऱ्हाडे म्हणाले.

ही बातमी वाचा: