जालना : लोकांचे घर उद्ध्वस्त करायचे, संतोष भैयांचा क्रूरपणे खून करायचा आणि तो व्हिडीओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा, अशा आरोपींसाठी तुम्ही आंदोलन करताय. त्याला पाठिंबा देताय. आता धनंजय मुंडेंच्या टोळीने ही नवीन पद्धत पाडल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी न्याय मागायचा नाही का? की तुमच्यासारखे आरोपीच्या मागे उभे राहायच? असा सवालही जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे म्हणाले की, "मुख्यमंत्र्याकडे आमची मागणी आहे की खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत. ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे, यातून कुणीही सुटता कामा नये. आरोपी ज्याच्या घरी राहिले त्याला सुद्धा आरोपी करायला पाहिजे. या सर्वांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. परळीतल्या एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे काय होणार? आम्ही त्यापेक्षा दहापट आंदोलन बीडमध्ये उभं करू? आम्ही सुद्धा सळो की पळो करू शकतो."
फडणवीस साहेबांनी या टोळीचा संपूर्ण नायनाट करायला पाहिजे. यातील एकही आरोपी सुटता कामा नये, नाहीतर मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या नावाला डाग लागेल असंही मनोज जरांगे म्हणाले.
देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटला नाही?
धनंजय मुंडे यांनी परळीत आल्यानंतर वाल्मिक कराडच्या कुटुंबीयांना भेट दिली. त्यावरून मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "चांगलं काम केलं त्यांनी. मंत्रिपदाचा फायदा घेतो. संतोष भैय्याचं कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या लोकांनी. संतोष भैय्याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीवरून हात फिरवायला तुला वेळ मिळाला नाही का? या सगळ्यामागे याचाच हात आहे का असा संशय आता आम्हाला येतोय?"
ओबीसींचं पांघरून घेतलं जातंय
मी कोणता जातिवाद केला का? यांचा काय संबंध माझ्या फोटोला जोडे मारायचा. संतोष देशमुख यांना न्याय मागायचा नाही काय़? तुमच्यासारखा आरोपीच्या बाजूने उभा राहायचं का? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला.
मनोज जरांगे म्हणाले की, "लोकांचे घर उद्ध्वस्त करायचे, संतोष भैयांचा क्रूरपणे खून करायचा आणि तो व्हिडीओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा, अशा आरोपींसाठी तुम्ही आंदोलन करताय. त्याला पाठिंबा देताय. ही रूढ पाडली का धनंजय मुंडेंच्या टोळीने आता? त्यांच्या जातीचा यामध्ये संबंध नाही. पाप तू करणार आणि ओबीसीचं पांघरून घेतो का? धनंजय मुंडे यांनी जात पणाला लावली."
धनंजय मुंडे यांनी जी टोळी चालवली ती थांबवावी. आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तुझ्यावर आता. तू आंदोलन करताना पहाटे येऊन भेटतो याचा अर्थ तुझाही हात आहे का या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली असं जरांगे म्हणाले.
ही बातमी वाचा: