Manoj Jarange Sabha At Jalna Today : जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकार दिलेल्या अल्टीमेटमच्या 10 दिवस अगोदर 14 तारखेला म्हणजेच, आज जालन्यातील (Jalna) आंतरवली सराटी (Antarwali Sarati) येथे सकल मराठा समाजाच्या (Maratha Samaj) वतीनं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी आज रात्रीपासूनच कार्यकर्ते आणि लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जरांगेंच्या सभेसाठी अयोजकांसोबतच प्रशासन देखील तयार झालं असून या सभेवर खबरदारी म्हणून ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे. याव्यतिरिक्त याठिकाणी मेडिकल इमर्जन्सीसाठी 60 रुग्णवाहिका देखील तैनात करण्यात येणार आहेत. 


ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation)  देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला दिलेली मुदत ही पुढच्या दहा दिवासांमध्ये संपणार आहे. त्याचाच आधी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. तसेच या सभेची सध्या जय्यत तयारी सुरु करण्यात आलीये. तर  100 एकर वरील मैदान हे सभेसाठी सज्ज झालयं. 


रात्रीपासूनच सभेसाठी गर्दी 


मनोज जरांगे यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात सभा आहे. त्यासाठी आज रात्रीपासूनच तिथं गर्दी झाली आहे. अनेक लोक गाड्या घेऊन आंतरवालीत आदल्या दिवशीच आले आहेत. रात्रभर मुक्काम करुन आज सभेला सर्वजण उपस्थिती लावणार आहेत. आजच्या सभेसाठी होणार अलोट गर्दी लक्षात घेत, पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


जालन्यात आज शाळा बंद 


जालन्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली केंद्रप्रमुख तथा मुख्यध्यापकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत. 


मनोज जरांगेंच्या सभेसाठी यंत्रणा सज्ज


मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. या 40 दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुदत यावेळी देण्यात आली आहे. तर, 14 ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे या निमित्ताने अंतरवाली सराटी गावात 14 ऑक्टोबरला सभा आयोजित करण्यात आली आहे. पण त्याआधी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा केला. 


जरांगेंची सभा 100 एकर ग्राऊंडवर घेण्यात येणार आहे. तर यासाठी 80 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीये. तर या सभेसाठी दहा हजार स्वयंसेवक हे उपस्थित राहणार आहेत. दहा अग्निशमन दलाच्या गाड्या सभेच्या स्थळी उपस्थित असतील. यामध्ये 110 रुग्णवाहिका, त्यात 35 कार्डीयाक अम्ब्युलन्स असणार आहेत. तसेच 40 बेडस, 300 डॉक्टर, 300 नर्सिंग स्टाफ असेल.  12000 लिटरचे 50 पाणी टँकर या सभेच्या मैदानात असतील. 5 लाख पाणी बॉटल्स, 1000 लाऊड स्पीकर, 20 LED स्क्रीनची तयारी या सभेसाठी करण्यात आली आहे. 


जरांगेंची मागणी काय? 


सरसकट मराठा आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी उपोषणाची हाक दिली. त्यांच्या या उपोषणाची दखल मुख्यमंत्र्यासंह अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी देखील घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेऊन सरकारला 40 दिवसांची मुदत दिली. तिच मुदत आता काही दिवसच उरले आहेत. त्याआधी त्यांच्या सभेतून ते कोणती महत्त्वाची घोषणा का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Manoj Jarange : 100 एकरवर सभा, 80 एकरवर पार्किंग, 5 लाख लि. पाणी, 600 डॉक्टर्स-नर्स, मनोज जरांगेंच्या सभेसाठी यंत्रणा सज्ज