Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis, Jalna :"सरकारला आरक्षणाचा मुद्दा झेपत नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले होते. न्यायालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्तेंना पुढं केलं. पहिल्यांदाही तोच होता 13 टक्के आरक्षण रद्द करायला. मागील आठवड्यात सदावर्तेंनी याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) तिथे सरकारी वकिलाला पाठवले. गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाचा विरोधक, फडणवीस पडद्यामागून सूत्र हलवतात",असं मनोज जरांग पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत. ते जालना येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनोज जरांगे पाटील म्हणाले,"एखाद्या खासगी माणसाने याचिका दाखल केली की, त्यात हस्तक्षेप करता येत नाही. सरकारला सेपरेट याचिका करावी लागते. तरीही हा त्यांच्या आडून गेला आणि मला उपचार घेण्यास सांगितलं. मी न्यायालयाचा मान ठेवला. मराठा समाजाचा मान ठेवला. मी वारकरी संप्रदायाला मानतो. त्यांच्या हातानी पाणी पिलो. त्यानंतर न्यायालय शांत झालं. मराठ्यांच्या मागील सुनावणसाठी 13 मार्च तारिख देण्यात आली. देवेंद्र फडणवीसांनी सदावर्तेंच्या याचिकेत हस्तक्षेप करायला सांगितला आणि एका रात्रीत तारीख बदलली."
कोपर्डीच्या बहिणीचा एका रात्रीत निकाल कसा लागत नाही?
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "त्या रात्री 56 आमदार एकत्र बसले होते. यांनी सांगितले की, जरांगेंनी रास्तारोको पुकारलाय. पुढे आणखी मराठे जमतील. ही यांची खासगी चर्चा आहे. एका रात्रीत यांनी न्यायालयाने दिलेली तारिख बदलली. 24 तारखेला रास्तारोको करता येऊ नये म्हणून 23 तारिख करण्यात आली. एवढं बदलू शकतं तर कोपर्डीची बहिण आमचीचं आहे. तिचा निकाल एका रात्रीत कसा लागत नाही? असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला.
शांततेत रास्तारोको करुनही आपल्या मुलांविरोधात गुन्हे दाखल केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना साथ देतात. हे दिसावं म्हणून वेड्यासारखं करतात. मोठंमोठे मराठा नेते यांनी जेरीस आणून ठेवलेत. मी म्हणालो मीच तिथे येतो काय गोळ्या घालायच्यात ते घाला. आमच्याविरोधात पोलिसांचा वापर केला जातोय. शांततेत रास्तारोको करुनही आपल्या मुलांविरोधात गुन्हे दाखल केले. एसपींचे मत आहे की, गृहमंत्रालयाचे आदेश आहेत, गुन्हे दाखल करा. मराठ्यांच्या जीवावर मंत्री होतात. सत्ता आणतात आणि विरोधात काम करतात. मी एवढे नेते आपल्या पक्षात आणलेत. मात्र, आपली सत्ता आणण्यासाठी जरांगे पाटील काटा आहे, असं त्यांना जाणवलय. त्यामुळे 10 टक्के आरक्षणाला माझ्याकडून होकार मिळवण्याचा प्रयत्न आहे.