Manoj Jarange on Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange)  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एकेरी उल्लेख करत आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. "मराठ्यांनो एकजूट फुटू देऊ नका. मला त्याच्या दारात जाऊ द्या", असे आवाहन जरांगे पाटील यावेळी करत आहेत. "फडणवीस, मी सागर बंगल्यावर येतो मला गोळ्या घाला, माझा बळी घ्या", अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी माडंली आहे. जरांगे पाटील सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहेत. मुंबईत जाण्यासाठी निघाले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 


जरांगे पाटील म्हणाले, "माझ्यावर सलाईनमधून विषप्रयोग करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर घ्या", असं खुलं आव्हान जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. हे षडयंत्र फडणवीसांचे असून शिंदे आणि अजित पवारांचे लोकही यामध्ये सामील असल्याचा आरोप जरांगे पाटील म्हणाले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीस यांचा हा बामणी कावा आहे, असेही जरांगे म्हणाले आहेत. 


औषधातून काटा काढा किंवा याला गोळ्या घाला. 


पुढे बोलताना जरांगे म्हणाले," मुंबईला जायला आग्रही नाही. माध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना घाबरू नये. जनता तुमच्या सोबत आहे. आम्ही न्यायालयाचा सन्मान केला. सलाईन घेतलं. शांततेत रस्ता रोको केला. तरी..ह्या ** ने आमच्यावर गुन्हे दाखल केले. इतक भयाण षडयंत्र याने रचले आहे. सरकार आणायचं असलं तर ह्यो काटा आहे. याचा काटा काढा. औषधातून काटा काढा किंवा याला गोळ्या घाला. एन्काऊंटर करा. त्याचे लोक गुप्त बैठका घेत आहेत. मला मुख्यमंत्री राहयचे असेल तर हा काटा काढावा लागेल". 


सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी मुद्दाम करत नाही


"माझी निष्ठा समाजाबरोबर आहे. समाज एक केलाय. समाजाने याला नेता मानलय. आपण दहा टक्के जरी दिले तरी हरकत नाही. याचा काटा काढा समाज बरोबर ऐकतो, असे फडणवीस म्हणाले असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय. शिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना साथ देत असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे. हे सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी मुद्दाम करत नाही", असेही जरांगे यांनी नमूद केले. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Manoj jarange Patil : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले, फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची भूमिका