Manoj Jarange Patil Abdominal Pain : आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) आमरण उपोषणासाठी (Hunger Strike) बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती आणखी (Health Updates) बिघडली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पोटदुखीचा त्रास (Stomach Pain) होत असून तो वाढतच आहे. बुधवारी जरांगेची तब्येत बिघडली होती. गुरुवारी सकाळपासून जरांगेंची प्रकृती आणखी खराब झाली आहे. जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. 10 फेब्रुवारीपासून जरांगे उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह नागरिक करत आहेत, 'पाणी घ्या' म्हणत आंदोलनस्थळी उपस्थितांची घोषणाबाजी सुरु आहे.
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली
आमरण उपोषण करणाऱ्या जरांगेंची भूमिका ठाम आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात व्हावं, अशी जरांगेंची मागणी आहे. त्यासाठीच जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी उपोषण सुरुच असल्याने जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे. जरांगेंना पोटदुखीचा त्रास होत आहे.
अशक्त जरांगे पाटील पोटदुखीनेही त्रस्त
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जरांगे पाटलांची प्रकृती बिघडत चालल्याने महिलांची रडारड सुरु असल्याचं चित्र आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे. अधिसूचनेच कायद्यात रुपांतर झालं पाहिजे. उपोषणामुळे जरांगेंची प्रकृती ढासळत चालली आहे. त्यांना बुधवारी सलाईल लाऊन, इंजेक्शन आणि औषधंही देण्यात आली. पण, त्यांनी सलाईन काढली. गुरुवारी सकाळपासून जरांगे पाटील प्रचंड अशक्त आहेत. जरांगे पाटील पोटाला धरून व्हिवळताना दिसत होते.
... तर जरांगे पुन्हा मुंबईत, आंदोलनाचा इशारा
मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मागणी पूर्ण झाली नाही, तर मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही जरांगेंनी दिला आहे. सरकार आता जरांगेंच्या उपोषणात मध्यस्थी करणार की जरांगे पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करणार हे पाहावं लागेल. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी घेणार आणि तसं नाही झालं तर, उपोषण करतच मुंबईत घुसणार, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :