जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 8 जूनला होणारं अंतरवाली सराटीमधील (Antarwali Sarati) आमरण उपोषण करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.

  


आपण ठरवलं होतं की आठ जूनला अंतरवाली सराटीत उपोषण करायचं पण या गावात आमरण उपोषण करण्यासाठी आपलं मन लागत नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. कारण पण असं आहे की गाव चांगल आहे, पण त्यांच गाव आपल्यामुळे अडचणीत येत आहे  असं त्यांचं म्हणणं असेल तर  गाव अडचणीत येऊ नये, गावचे लोक अडचणीत येऊ नये. अशी आपली भावना आहे. त्यामुळं तिथं आता आमरण उपोषण करायला मन लागत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.


८ जूनला आमरण उपोषण कुठे करायचं, समाजाला विचारून तुम्हाला सांगेल, अशी माझी आत्ताची भावना आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. समाजाचं काम होऊ द्यायचं नाही असं एखाद्यानं ठरवलं असेल. षडयंत्र रचलेलं असेल, स्वत:ची गाडी स्वत:  फोडायची असं केलं जातं. सरकारचा डाव ठरलेला असतो तुला काही धक्का लागला तर आम्ही आहे, असं त्यांना सांगितलेलं असतं. गाव अडचणीत आणायचं ठरवलेलं असतं. गावकऱ्यांची इच्छा गावात आंदोलन करण्याची आहे. अंतरवाली सराटी ही पवित्र भूमी आहे. एखाद्यानं गाव अडचणीत आणायचं ठरवलं, चार पाच जणांनी गाव अडचणीत आणायचं ठरवलं तर आणू शकतात. पण, मला गाव अडचणीत आणायचं नाही. तुमचं गाव ,तुम्ही  गुण्यागोविंदाने नांदा ,तुम्ही सुखात रहा .गाव अडचण येऊ नये अशी इच्छा आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. 


माझ्यामुळे तुमच्या गावाला अडचणीत यायचं काम नको. त्यांची इच्छा आहे की आमच्या गावात आंदोलन नको. तर, आपण का बळजबरीने उपोषण करावं, असं मनोज जरांगे म्हणाले. 


शेवटी मराठ्यांनी मराठ्यांना हरवायचं ठरवलं असेल तर...


शेवटी मराठ्यांनी मराठ्यांना हरवायचं ठरवलं असेल तर उद्देश मनात जर पक्का असेल, हे करायचंच तर ते करु शकतात. त्यामुळं  8 जूनला अंतरवाली सराटीत उपोषण नको तर आपण का बळजबरीनं उपोषण करावं? उपोषण नाही करायची अशी माझी भावना झाली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आंदोलन कुठं करायचं काय करायचं यासाठी मायबाप समाजाला विचारुन निर्णय घेईन, असं मनोज जरांगे म्हणाले. 


आम्ही लढलो, गावानं खूप प्रेम केलं, माया केली याबद्दल त्यांचा आभारी आहे. लोकांनी जाणून बुजून षडयंत्र रचलेलं आहे. लोकांना त्रास व्हायला नको त्यामुळं मी अंतरवाली सराटीत उपोषण करायचं नाही, असा निर्णय घेतल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.   


संबंधित बातम्या : 


मोठी बातमी! अखेर मनोज जरांगेंचं उद्याचं उपोषण स्थगित, ग्रामस्थांनीच केला होता विरोध; आता, काय म्हणाले पाटील...


मनोज जरांगेंच्या उपोषणाला आता अंतरवाली ग्रामस्थांचाच विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन; काय आहे राज'कारण'