Jalna Crime News: जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड तालुक्यातील करंजळा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात गाय चारण्याच्या किरकोळ वादातून एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या (Farmer Murder) करण्यात आली आहे. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामा पिराजी घुले (वय 48 वर्षेम रा. करंजळा, जालना) असे मृत व्यक्तीचे नाव असून, शोक सावंत, लहू सावंत, दत्ता सावंत, रामेश्वर सावंत, शंकर धुमक आणि भगवान धुमक असे आरोपींचे नावं आहेत. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास रामा घुले आपल्या घरी असतानाच, तिथे मुख्य आरोपी रामेश्वर अशोक सावंत यासह आणखी पाच जण तिथे आले. दरम्यान रामा घुले यांच्या मुलगा याला अभिषेक घुले यांना शिवीगाळ देण्यास सुरवात केली. तसेच तुझा बाप आमच्या शेतात जनावरे सोडुन शेताचे व पिकाचे नुकसान करतो. त्याला आता आम्ही जिवंत सोडणार नाही असे म्हणुन, शिवीगाळ सुरु केली. दरम्यान याचवेळी रामा घुले यांनी अशोक सावंत याच्यासह आलेल्या इतरांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. 


रामा घुले समजून सांगत असतानाच अशोक सावंत याने आपल्या हातातील कुऱ्हाडीने रामा यांच्या हल्ला केला. तसेच त्यांच्या डोक्यावर एकामागून एक असे वार केले. थेट डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला केल्याने रामा घुले गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच कोसळले. धक्कादायक म्हणजे आरोपी एवढ्यावरच थांबले नाही. तर शंकर लक्ष्मण धुमक आणि भगवान लक्ष्मण धुमक या दोघांनी हातातील काठी व लोखंडी रॉडने रामा घुले यांच्या पायावर व हातावर मारहाण केली. त्यामुळे या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. 


आई लेकाला देखील मारहाण...


दरम्यान याचवेळी आपल्या वडीलांना मारहाण होत असल्याने अभिषेक घुलेचा भाऊ आणि आई त्यांना वाचवण्यासाठी गेले. तेव्हा दत्ता लहू सावंत याने अभिषेक याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करत त्याला जखमी केले. तर त्याच्या आईला लहू रामा सावंत याने हातातील लाठीने बेदम मारहाण केली. ज्यात दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर याप्रकरणी अभिषेक घुलेच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Jalna Crime News ; संतापजनक! मुल होत नसल्याने पत्नीच्या डोक्यात शस्त्राने वार करून केली हत्या