Raosaheb Danve Angry In Jalna : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आपल्या हटके भाषणाने आणि विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. थेट बोलण्याची त्यांची सवय देखील नेहमीच चर्चेत असते. आता त्यांच्या याच सवयीचा आणखी एक अनुभव कार्यक्रमासाठी आलेल्या एका कार्यकर्त्याला आला आहे. कारण रावसाहेब दानवे भाषण करत असताना हसणाऱ्या एका कार्यकर्त्याला त्यांनी भर कार्यक्रमात झापले. त्याच्या वागण्याने दानवे चांगलेच संतापले होते. त्यांच्या हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


झालं असे की, जालना शहरातील भारती लॉन्समध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थी कर्ज वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच कार्यक्रमासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. दरम्यान सर्वात शेवटी दानवे यांच्या भाषणाला सुरवात झाली. तर दानवे यांचे भाषण सुरु असताना मधेच एक कार्यकर्ता हसू लागला. भाषण सुरु असतानाच या हसणाऱ्या कार्यकर्त्याकडे दानवे यांचे लक्ष गेले आणि त्याला पाहून दानवे भडकल्याचे पाहायला मिळाले. एवढच नाही तर या कार्यकर्त्याला कार्यक्रमातून दानवे यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे नेहमी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना हसवणाऱ्या दानवेंचा संतापेला रूप पाहून, कार्यकर्त्यांना देखील धक्का बसला. 


नेमकं काय झालं! 


जालना शहरातील भारती लॉन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थी कर्ज वितरण कार्यक्रमात दानवे भाषण करत असतानाच, समोर बसलेला एक कार्यकर्ता हसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याच्याकडून पाहून दानवे म्हणाले की, 'ये हसणारा...बिड्या पिण्यासाठी आला का?...मी काय बोलतोय. तू लाभधारक आहे का?, चल उट मग...बाकीच्यांना डिस्टर्ब करतोय”, असे म्हणत दानवे यांनी या कार्यकर्त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.  


दानवे सांगता होते कोरोनाचा किस्सा! 


आपल्या भाषणातून दानवे हे देशात कोरोना कसा आला याबाबत माहिती देत होते. ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोना झाला आणि त्यामुळे लोकसभा अधिवेशन सुरु ठेवावा का? याबाबत चर्चा सुरु झाली. परंतु आपल्या देशात कोरोना येण्याच्या सहा महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी करून ठेवली असल्याचं दानवे म्हणाले. दरम्यान असे बोलत असतानाच समोरील कार्यकर्ता हसला आणि दानवे संतापले. त्यांच्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


पाहा व्हिडिओ!



इतर महत्वाच्या बातम्या: 


Chitra Wagh: भाजप मेळाव्यात चित्रा वाघ कडाडल्या'; आपल्याच महिला पदाधिकाऱ्यांवर केली 'फायरिंग'