Jalna Traffic Update: गजानन महाराज संस्थानची पायदळवारी पालखी परंपरेनुसार पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर निघाली असून, या दिंडीमध्ये एक हजार पेक्षा अधिक वारकरी सहभागी आहेत. दरम्यान परतीच्या मार्गावर असलेली श्री ची पायी दिंडी उद्या 14 जुलै रोजी जालना (Jalna) शहरात प्रवेश करणार आहे. तर 14  ते 15 जुलै पर्यंत कदिम जालना व सदर बाजार परिसरात ही दिंडी मुक्कामी असणार आहे. त्यानंतर 16 जुलै रोजी नाव्हामार्गे बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजाकडे प्रयाण करणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जालना शहरातील वाहतूक बदल करण्यात आले आहे. 


गजानन महाराज यांची दिंडी परतीच्या मार्गावर आहे. दरम्यान शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस ही दिंडी जालना शहरात असणार आहे. त्यामुळे या दिंडीचे दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन, अवजड वाहनांच्या रहदारीमुळे शुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षीततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी सदर मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. त्याअर्थी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये जालना शहरात येणारी व जाणारी अवजड वाहनांना 15 जुलै रोजी सकाळी 6.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे असे आदेश पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत. 


वाहतुकीत असा असणार बदल...



  • बसस्थानकाकडून सुभाष चौकामार्गे छत्रपती शिवाजी जुना जालन्यात जाणारी वाहतुक लक्कडकोट बाजीराव पेशवे जातील व येईल. 

  • बस स्थानकाकडून पाणीवेस काद्राबाद चौकी मार्गे मंगळ-बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतुक ही भोकरदन नाका कन्हैयानगर मार्गे बायपास रोडने जाईल व येईल. 

  • बस स्थानकाकडून मामाचौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणारी वाहतुक ही भोकरदन नाका कन्हैयानगर मार्गे बायपास रोडने जाईल व येईल. 

  • छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाकडुन टांगा स्टँड मार्गे तसेच पाणीवेश मार्गे बसस्थानक व जुना जालना जाणारी वाहतुक ही शिवाजी पुतळा चौका जवळुन रामनगर मार्गे बायपास रोडने अंबड चौफुली मार्गे जाईल व येईल. 

  • मंगळ बाजार- काद्राबाद चौकी परिसरातील सुभाष चौकातुन जुना जालनाकडे जाणारी वाहतुक ही मंगळ बाजार– चमडा बाजार- राजमहल टॉकीज पुलावरुन जुना जालन्यात जाईल व येईल. 

  • रेल्वे स्टेशन-गांधीचमन कडून मंमादेवी-सुभाष चौक मार्गे नवीन जालन्यामध्ये येणारी वाहतुक ही मंमादेवी चौकातुन एमएसईबी ऑफीस-राजमहल टॉकीज पुल-चमडा बाजार मार्गे जाईल व येईल.

  • वरील मार्गाची अवजड वाहतुकीमध्ये जुलै रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन धारकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


जालना जिल्ह्यातील प्रकल्पात 10 टक्के पाणीसाठा शिल्लक; ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता