Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Second Phase) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली असताना अजूनही अनेक मतदारसंघात उमेदवारच ठरत नसल्याचे चित्र आहे. अशीच काही अवस्था जालना लोकसभा मतदारसंघात (Jalna Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून (BJP) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)  यांची उमेदवारी जाहीर झाली, त्यांनी प्रचारही सुरु केला, मात्र महाविकास आघाडीत अजूनही जालन्यातील (Jalna) उमेदवारच निश्चित होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ काँग्रेसकडे (Congress) जाणार असून, माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या नावाची चर्चा आहे. पण यावर कोणतेही अधिकृत घोषणा होतांना दिसत नाही. 


जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मागील पाच लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा सतत या मतदारसंघातून विजय होतांना पाहायला मिळाले. आता सहाव्यांदा रावसाहेब दानवे या मतदारसंघातून आपलं नशीब अजमावत आहे. पण यंदाच्या निवडणुकीत विरोधाकांना दानवेंना तोड देणारा दमदार उमेदवार अजूनही मिळाला नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला हा मतदारसंघ सुटला असून, काँग्रेसकडून चांगल्या उमेदवारीचो शोधाशोध सुरु आहे. अशात माजी आमदार कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा आहे. काळे यांनी 2009 मध्ये देखील दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवत चांगली लढत दिली होती. यावेळी त्यांचा अवघ्या 8 हजार 482 मतांनी पराभव झाला होता. मात्र, पुढे 2014 ला मोदी लाटेत दानवे यांनी पुन्हा विजय मिळवत, 2019 मध्ये देखील तो काय ठेवला. 


रावसाहेब दानवे लागले प्रचाराला....


एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे रावसाहेब दानवे मात्र प्रचाराला लागले आहेत. मतदारसंघातील वेगवेगळ्या तालुक्यात दानवे दौरा करत असून, सर्व सुपर वॉरिसर्स, बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ समिती, पेज प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक घेत त्यांचाशी संवाद साधत आहे. याच दरम्यान त्यांनी सिल्लोड मधील व्यापारी बांधवांची भेट घेतली, आणि त्यांच्याशी त्यांच्या व्यावसायासंदर्भात चर्चा केली. याच प्रमाणे ते जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात जाऊन लोकांशी संवाद साधतांना दिसत आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत असल्याचे चित्र आहे. 


अर्जुन खोतकर दानवेंना मदत करणार का?


दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. स्थानिक भाजप नेत्यांकडून शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा त्यांचा आरोप होता. अशात आता लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर रावसाहेब दानवे यांना मदत करणार का? अशी देखील चर्चा आहे. यावर बोलतांना दानवे म्हणाले की, “ आम्ही एकमेकांचे जवळचे आहोत. आम्ही 15 दिवसांपूर्वी सोबत होते. अर्जुनराव माझे मित्र असून आणि मित्र पक्षाचे नेते आहेत. 1990 पासून आम्ही सोबत आहोत. आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही, असे दानवे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Raosaheb Danve on Eknath Shinde : निवडून येणे हेच आमचं सूत्र, उमेदवार बदलण्यासाठी भाजपचं प्रेशर नाही, एकनाथ शिंदेंबाबत रावसाहेब दानवे काय काय म्हणाले?