जालना : जिल्ह्यात एक भीषण अपघाताची (Accident) बातमी समोर येत असून, ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे धुळे-सोलापूर महामार्गावर (Dhule-Solapur Highway) हा भीषण अपघात झाला आहे. पुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून आलेल्या भरधाव कारने धडक दिली. ज्यात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुषांसह एका 10 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील धुळे-सोलापूर महामार्गावर कारने रस्त्यावर उभा असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात काही वेळापूर्वी घडला आहे. दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. तसेच, कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, अपघातात मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
उभ्या कंटेनरला धडक...
अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील धुळे-सोलापूर महामार्गावर असलेल्या पुलावर रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता. दरम्यान याचवेळी मागून आलेल्या भरधाव कारने या कंटेनरला जोराची धडक दिली. त्यामुळे परिसरात जोराचा आवाज आला. कारचा वेग अधिक असल्याने या कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. तर, याच कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही कार बीडच्या दिशेने जात असतांना हा अपघात झाला आहे. अजुन मृतांची ओळख पटली नसून, पोलिसांकडून तपास केला जात आहे.
कारमधील मृतांचे अक्षरशः तुकडे झाले
जालना येथील धुळे-सोलापूर महामार्गावर झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त कार अक्षरशः कंटेनरखाली दबली गेली होती. तर, कारमधील मृतांचे अक्षरशः तुकडे झाले आहे. त्यामुळे, कंटेनरखाली दबली गेलेली कार बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. दरम्यान, अपघात घडताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी जेसीबीच्या मदतीने मृतदेह आणि कार बाहेर काढली. यावेळी, रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवत, रस्ता मोकळा केला.
इतर महत्वाच्या बातम्या: