जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला देण्यात आलेली मुदत 24 डिसेंबरला संपत आहे. त्यानंतर, आपण आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांनी म्हटले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे यांची समजूत घालण्यासाठी आज पुन्हा सरकारचं एक शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत जाणार आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), उदय सामंत (Uday Samant) आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा या शिष्टमंडळात सहभाग असणार आहे. या तीनही नेत्यांचं शिष्टमंडळ दुपारी दोन वाजता आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गावात जाऊन जरांगे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली 24 डिसेंबरची मुदत पुढील तीन दिवसांत संपणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची आज दुपारी 2 वाजता आंतरवाली सराटीत भेट घेणार आहे. मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, बच्चू कडू हे तीनही नेते जरांगे यांनी भेट घेणार आहे. मंत्री उदय सामंत मुंबईतून, तर गिरीश महाजन आणि बच्चू कडू नागपूरमधून आंतरवाली सराटीकडे रवाना होतील. त्यामुळे आजच्या बैठकीत सरकारच्या शिष्टमंडळात आणि मनोज जरांगे यांच्यात कोणती चर्चा होते. तसेच,. त्यातून काही मार्ग निघतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.