जालना : भरधाव आयशर आणि अॅपे रिक्षाची समोरासमोर (Eicher rickshaw accident) धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील जाफराबाद माहोरा रोडवर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. परवीन बी राजू शहा ( वय 25 ), आलिया राजू शहा (वय , 7 ), मुस्कान राजू शहा ( वय 3), कैफ अशपाक शहा ( 19 ) आणि मनीषा तिरुखे  (वय 26 ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. जालन्यातील जाफराबाद-भोकरदन रस्त्यावर माहोरा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. (Five killed in Eicher rickshaw accident at Jalna)


अपघातातील सर्व मयत हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील असून पोलिस आणि ग्रामस्थांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे. हा अपघात एवढा भीषण होता की आयशरच्या धडकेत रिक्षाचे अवशेष तुटून सर्वत्र विखुरले होते. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना उपचारासाठी रूग्णालयता दाखल केले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून पोलिस याबाबत अधिक तवार करत आहेत. 


आयशर आणि रिक्षा यांच्यात (Eicher rickshaw accident) ही धडक एवढी भीषण होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये दोन महिला आणि ती पुरुषांचा समावेश आहे.  


दिवसात दुसरा अपघात


 दरम्यान, आज सकाळीच पुण्याहून रिसोडकडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये जवळपास दहा पवाशी जखमी झाले आहेत. हा अपघा आज पहाजे पाच वाजण्याच्या सुमारास बदनापूर शहरातील औरंगाबाद -जालना महामार्गावर झाला आहे. ट्रॅव्हल्स बस ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.  बस ट्रकला घासत दुभाजकावर उलटल्याने हा अपघात झाल्याची महिती समोर आली आहे. या अपघातात एक प्रवाशी गंभीर झाला असून 10 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णलायत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. (Jalna Accident News )   


महत्वाच्या बातम्या


अशोक चव्हाणांवर शिंदे सरकारची मेहेरनजर, नांदेड-जालना महामार्गासाठी 'हुडको'कडून 2140 कोटी मंजूर