जालना : अंतरवली सराटी (Antarwali Sarathi Lathicharge) येथील उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये (Jalna Police) झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी आरोपी ऋषिकेश बेदरेसह शनी सिरसट, कैलास सुरवसे यांना जालन्यातील अंबड पोलिसांनी अटक केली आहे. तर, या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपी बेदरे कडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. 


जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु असतांना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर दगडफेकीची घटना समोर आली होती. तसेच, पोलिसांकडून देखील लाठीचार्ज करण्यात आला होता. या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यात मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेदरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतांना जालना पोलिसांनी ऋषिकेश बेदरे यांना शुक्रवारी अटक केली आहे. तसेच, त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस देखील पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बेदरे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, आज या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


जालन्याच्या अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक, पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त