बुलढाणा : बुलढाण्याच्या चिखलीमध्ये सोमठाणा गावात शेतकरी नेते  रवीकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar)  शेकडो शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन (Hunger Strike) सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा पहिला दिवस आहे.   कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनावर आधारित सरकराने लवकरात लवकर भाव द्यावा,अशी  आंदोलकांची मागणी आहे.  कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबात सरकारनं आठवड्यात निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.  तर सरकारनं निर्णय न घेतल्यास 29 नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेऊ, असा इशारा देखील तुपकरांनी यावेळी दिला आहे.


गेल्या दोन वर्षापासून कापूस आणि सोयाबीन यांना शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. या उलट उत्पादनासाठी खर्च जास्त लागतोय आणि त्यामानाने कापूस आणि सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.  कच्च्या मालावर अवलंबून असणारे उद्योगही ठप्प पडले आहे.  मात्र निगरगट्ट सरकार यावर कुठलीही भूमिका घ्यायला तयार नाही.  त्यामुळे 28 तारखेपर्यंत सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत तात्काळ भूमिका घ्यावी अन्यथा 29 नोव्हेंबर रोजी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसह मी मुंबईत धडकून मंत्रालय ताब्यात घेऊ असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.  त्यामुळे आता आगामी काळात कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. 


सोमठाणा या गावात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात


चिखली तालुक्यातील जालना - खामगाव महामार्गावर असलेल्या सोमठाणा या गावात अन्नत्याग आंदोलनाला तुपकर बसले आहेत. कापूस आणि सोयाबीनला सरकारने लवकरात लवकर उत्पादनावर आधारित भाव द्यावा या मागणीसाठी रविकांत तुपकरंनी शेकडो शेतकऱ्यांसह रात्रीपासूनच अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या पुढे कापूस आणि सोयाबीन प्रश्नावर चिखली तालुक्यातील सोमठाणा हे गाव  केंद्रबिंदू असेल अशी घोषण रविकांत तुपकर यांनी या वेळी केली.


 तुपकरांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवला


रविकांत तुपकर मंत्रालय ताब्यात घेण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवला आहे .रविकांत तुपकर यांच्या घरासमोर एक पोलीस निरीक्षक एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व दहा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.


रविकांत तुपकरांना अटक, त्यानंतर सुटका


कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत रविकांत तुपकर यांनी 29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत 29 नोव्हेंबर रोजी मंत्रालय ताब्यात घेणारच अशी भूमिका पोलिसांना कळविल्याने रविकांत तुपकर यांना आज अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविकांत तुपकर याना बिनशर्थ जामीन मंजूर झाला आहे. रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी रविकांत तुपकर यांची बाजू मांडली आहे.