Accident on Jalna Ch. Sambhajinagar Highway : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) - जालना (Jalna) या महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात (Accident) झाला. खासगी ट्रॅव्हल बस पुलावरून सुमारे 8 फूट खाली कोसळ्यानं 16 प्रवासी जखमी झाले, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. ही ट्रॅव्हल्स पुण्याहून (Pune News) नागपूरकडे (Nagpur News) जात असताना हा अपघात झाला. मागील वाहनाला साईड देताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.


जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Jalna Ch. Sambhajinagar Highway) मात्रेवाडीजवळ खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (Accident News Updates) झाला. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. मध्यरात्री 12च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल्स पुण्याहून नागपूरकडे जात होती. जालनाजवळील मात्रेवाडी येथील एका लहान पुलावर ही बस येताच ती थेट 7 ते 8 फूट खाली कोसळली आणि अपघात झाला, अशी माहिती मिळत आहे.                       


पुण्याहून नागपूरकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स जालन्यातील मात्रेवाडी येथील एका लहान पुलावर आली. तेवढ्यात मागून येणाऱ्या एका वाहनाला साईड देण्यासाठी चालकानं बस पुलाच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पण याच प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट पुलावरुन खाली कोसळली. बस पुलावरून 7 ते 8 फूट खाली कोसळली. बसमधून चालक आणि वाहकासोबत एकूण किती प्रवासी प्रवास करत होते, याची माहिती मिळालेली नाही. मात्र, बसमधून प्रवास करणाऱ्यांपैकी 16 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.               


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. अपघातातील सर्व जखमींना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.                        


पाहा व्हिडीओ : Sambhajinagar Highway accident : संभाजीनगर -जालना महामार्गावर अपघात,16 जण जखमी एकाची प्रकृती गंभीर



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Chhatrapati Sambhajinagar : कुलूप लावून वॉचमन निघून गेला, चिमुकली वर्गातच अडकली; सात तासांनी नागरिकांनी केली सुटका