Jalgaon News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा काही जागांवर सुटला असून काही जागांसाठी चर्चा सुरु आहे. त्यातच जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर आहे...


काल मुंबई येथील मातोश्री दरबारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या जळगाव लोकसभा समन्वयक अ‍ॅड. ललिता पाटील (Adv. Lalita Patil) यांनीही उपस्थिती दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. 


भाजपाने डावलल्याचा आरोप


2009 मध्ये काँग्रेसमधून भाजपामध्ये (BJP) आलेल्या अ‍ॅड. ललिता पाटील यांच्या म्हणण्यानुसार भाजपामध्ये गेल्या पाच वर्षात आपण प्रामाणिकपणाने काम करून देखील आपल्याला कोणतेही पद देण्यात आले नाही. भाजपच्या बैठकांना ही आपल्याला बोलविले जात नव्हते. सातत्याने आपल्याला डावलण्यात येत होते, असा आरोप अ‍ॅड. ललिता पाटील यांनी केला आहे.


लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा - अ‍ॅड. ललिता पाटील


आपल्याला लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. मात्र, भाजपाकडून आपल्याला तिकीट मिळण्याची आशा संपुष्टात आल्याने आपण शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज अधिकृतरित्या मातोश्रीवर प्रवेश घेणार असून उद्धव ठाकरे गटाच्या कडून आपल्याला जळगाव लोकसभा मतदार संघासाठी तिकीट मिळेल, असा विश्वास असल्याचेही अ‍ॅड. ललिता पाटील यांनी म्हटले आहे. 


ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार?


अ‍ॅड. ललिता पाटील या देखील आता जळगाव लोकसभा साठी उद्धव ठाकरे गटात सहभागी होऊन उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. या अगोदर डॉ. हर्षल माने, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची नावे जळगाव लोकसभेसाठी चर्चेत असताना आता उद्धव ठाकरे गट कोणाला उमेदवारी देतो? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.


गुलाबराव पाटलांचे ठाकरे गटाला आव्हान


जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराने किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं. डिपॉझिट ते वाचवू शकत नाही. बाकी काय बोलायचं, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis : पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करणार; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य


यांना लग्नातही बोलावू नये, 35 पुराणपोळ्या खातील आणि नवरा बायकोचं भांडणं लावतील, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका