मुक्ताईनगर/जळगाव: नगर परिषद निवडणुकीच्या दिवशी (मंगळवारी ता, २) मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा दावा करीत काही शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता निवडणुकीत मुक्ताईनगरमध्ये शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) या खुर्ची टाकून मतदार केंद्रावर पोलिसांशी बाचाबाची घालतानाचा व्हिडिओ (Video Viral) व्हायरल झाला आहे.
Rohini Khadse: कार्यकर्त्यांना बाहेर काढा मग मी जाते
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते या मतदान केंद्रावर गर्दी करत असल्याचा आरोप केला असून त्या मतदान केंद्रावर या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढा असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. तेही कार्यकर्त्यांना बाहेर काढा मग मी जाते अशा आशयाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे. मुक्ताई प्रभाग क्रमांक एक या प्रभागात रोहिणी खडसे या मतदान केंद्रावर असताना यावेळी पोलिसांची त्यांची बाचाबाची झाली आहे. विशेषता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत नसताना यावेळी पोलिसांची रोहिणी खडसे यांची बाचाबाची झाली आहे.या घटनेचे व्हिडीओ आता समोर आले आहेत.
Muktainagar BJP VS Shivsena: भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचे हे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वाहने समोरासमोर आल्यानंतर हा राडा झाल्याचं सांगण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे मतदान केंद्रांबाहेर मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.