Chandrakant Patil on Eknath Khadse : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी काल राज्यभर मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. काही भागात शांततेत मतदान पार पडले तर काही ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मतदानानंतर राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
कोट्यावधी रुपयांचे गौण खनिज एकनाथ खडसेंनी चोरले
जळघावमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोट्यावधी रुपयांचे गौण खनिज एकनाथ खडसेंनी चोरले आहे. राज्यातील मोठं मोठी पदे त्यांच्याकडे असताना त्यांच्या दडपशाहीमुळे काही गोष्टी समोर आल्या नाहीत. अंजली दमानिया यांच्याबाबतचा 509 कलम सारखा गुन्हा एकनाथ खडसेंवर दाखल असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. एकनाथ खडसे किती मोठा गुन्हेगार आहे, हे काय लोकांना गुन्हेगार सांगणार असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेंवर गंभीर आरोप केले आहे.
मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा
महत्वाच्या बातम्या: