N D Mahanor : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय. ना.धो. महानोर यांच्या रुपाने आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा निसर्ग कवी, भूमिपुत्र हरपल्याची भावना जैन उद्योग समुहाचे प्रसिद्ध उद्योजक अशोक जैन (Ashok Jain) यांनी व्यक्त केली. महानोर हे दोन टर्म विधान परिषदेचे आमदार होते. याकाळात महानोर यांनी पाणी आडवा पाणी जिरवा अतिशय अभिनव अशी संकल्पना राबवली. या योजनेचे जनक म्हणूनही महानोर यांना ओळखलं जातं, असे जैन म्हणाले. तसेच 1986 साली देशात ठिबक सिंचनाचा पहिला संच हा महानोर यांच्या जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील शेतीत लावण्यात आल्याचे जैन म्हणाले.
ना धों महानोर हे आत्याधुनिक शेतीचे पुरस्कर्ते
जैन उद्योग समुहाचे उद्योजक अशोक जैन यांनी ना धों महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेती संदर्भातील त्यांची आस्था आणि प्रेम त्यांनी सांगितले. महानोर हे दोन टर्म विधानपरिषदेचे आमदार होते. या आमदारकीच्या कार्यकाळात महानोर यांनी पाणी आडवा पाणी जिरवा अतिशय अभिनव अशी संकल्पना राबवली. त्यांना या योजनेचे जनक म्हणूनही ओळखलं जातं असे जैन म्हणाले. ना. धो. महानोर हे शास्त्रीय तसेच अत्याधुनिक शेतीचे पुरस्कर्ते देखील होते. 1986 ला देशात ठिबक सिंचनाचा पहिला संच हा महानोर यांच्या जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील शेतीत लावण्यात आल्याची माहिती जैन यांनी दिली. कांताबाई भवरलाल जैन आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे ते सल्लागार समितीचे सदस्य देखील होते. बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टचे देखील ते विश्वस्त होते.
शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा निसर्ग कवी आणि भूमिपुत्र हरपला
अशोक जैन यांचं वाकोद हे मुळगाव. या गावापासून दोन किलोमीटरच्या अंतरावरच पळासखेडा हे गाव आहे. त्यामुळं स्वर्गीय भवरलाल जैन आणि ना. धों. महानोर यांची निरागस मैत्री ही सर्वश्रुत होती असेही जैन म्हणाले. ना धों महानोर यांच्या रुपाने आपल्या शब्दांनी रसिकांना समृद्ध करणारा निसर्ग कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे मोठे दुःख असल्याची भावना अशोक जैन यांनी व्यक्त केली. आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असलेल्या ना धो महानोर यांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात 3 ऑगस्टला सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ते सातत्याने आजारी होते. तर हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना 20 दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर गुरुवारी (3 ऑगस्टला) त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्त्वाच्या बातम्या: