चोपडा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (MSRTC) विविध श्रेणींच्या कामगिरीचे मुल्यांकन करून त्यांना दर महिन्याला रँकिंग दिले जाते. एप्रिल 2024 या महिन्यात प्रवाशांना चांगल्या सुविधा, सुरक्षित प्रवास, उन्हाळी सुटी व लग्नसराईत मेहनतीच्या जोरावर राज्यात 'अ' वर्गात 100 पैकी 92 गुण मिळवून चोपडा आगाराने (Chopra Bus Depot) प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 


चोपडा आगाराने उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य टिकवून चांगले उत्पन्न मिळवले आहे. चोपडा आगाराने राज्यात अव्वल स्थान मिळविल्याने विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी आगार प्रमुख महेंद्र पाटील (Mahendra Patil) यांच्यासह प्रशासन व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले. स्वच्छ व सुंदर बसस्थानक म्हणुन नावलौकिक असलेल्या चोपडा आगारातर्फे उन्हाळी सुट्या व लग्नसराई लक्षात घेता पुणे (Pune), नाशिक (Nashik), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), सुरत (Surat), जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule) येथे जादा वाहतूक करून प्रवाशांना सुरक्षित व सुखकर सेवा देऊन विविध सोयी उपलब्ध करुन दिल्या. 


चोपडा आगारात 295 कर्मचारी कार्यरत


विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध घटकांतील प्रवाशी आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. चोपडा आगारात एकूण 76 वाहने असून जवळपास दररोज 29 हजार किमीचा प्रवास केला जातो. चोपडा आगारात 157 चालक, 146 वाहक, 38 प्रशासन, 52 कार्यशाळा कर्मचारी असे एकूण 395 कर्मचारी कार्यरत आहेत.


चोपडा आगारातर्फे लवकरच चार्जिंग बसेसची सुविधा


विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छ सुंदर बसस्थानक, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुख सुविधा व उत्पन्न वाढीसाठी केलेले नियोजनामुळे व चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय सहकारी  यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे व कामामुळे राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला. याचे सर्व श्रेय चोपडा आगारातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना जाते, असे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले. लवकरात लवकर चोपडा आगारातर्फे चार्जिंग बसेसची सुविधा प्रथमच चोपडा तालुक्यात सुरू होणार आहे. याबाबतचे काम देखील सुरू झालेले असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


एसटीच्या ई-बसमध्ये 'अर्थपूर्ण' व्यवहाराचा संशय; कंत्राट रद्द करण्याची कामगार संघटनांची मागणी


बीडमध्ये ACB कारवाईचा धडाका, लाचखोरांच्या आवळल्या मुसक्या; आता ST मधील अधिकाऱ्यास रंगेहात अटक