Continues below advertisement


जळगाव :  राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून चोरी आणि दरोडेही पोलिसांपुढे आव्हान बनत आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगरवरणगाव शिवारातील पेट्रोल पंपांवर गेल्या आठवड्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. विशएष म्हणजे मुक्ताईनगरमधील हा पेट्रोल पंप केंद्रीयमंत्री रक्षा खडसे (Raksha khadse) यांच्या मालकीचा असल्याने पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली. येथील सशस्त्र दरोड्याप्रकरणी पोलिसांनी (Police) आता सहा जणांची टोळी जेरबंद केली आहे. त्यामध्ये, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे आरोपीही अटक करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.


मुक्ताईनगर येथील रक्षा टोफ्युअल, कर्की फाटा येथील मनुभाई आशीर्वाद आणि वरणगावजवळील तळवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवत 9 ऑक्टोबरच्या रात्री दरोडा टाकण्यात आला होता. आरोपींनी रोख रक्कमसह मोबाईल, आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक तयार केले होते. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पथकांनी नाशिक व अकोला येथे छापे टाकून सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षलदेवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक केली. सध्या सर्व आरोपी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


घाटकोपर ज्वेलर्स दुकानातील दरोडा, दोन आरोपींना अटक (Ghatkopar jewellers shop)



दरम्यान, मुंबईतील घाटकोपर येथेही एका सराफाच्या दुकानात दरोडा टाकल्याची घटना घडली होती, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या दरोडा प्रकरणी पोलिसांनी शोधासाठी 14 टीम बनविल्या आहेत. प्रथमदर्शनी तीन लोक यात असून दुकानातील तीन तोळे सोने चोरल्याचं पाहायला मिळत आहे. येथील, सुदैवाने ज्वेलर्स मालकची तब्येत स्थिर आहे, अशी माहिती उपायुक्त राकेश ओला यांनी दिली आहे. तर, घाटकोपर दरोड्यातील दोन आरोपींना अटक करण्यात घाटकोपर पोलिसांना यश आलं आहे. त्यामध्ये, अटक केलेले आरोपी कुर्ला, साकीनाका परिसरातील आहेत, तर आणखी एका आरोपीचा शोध सुरूच आहे. 


हेही वाचा


पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर