Gulabrao Patil on Sanjay Raut :  संजय राऊत यांनी आम्ही दिलेली मते परत करावी. त्यानंतर आमच्यावर टीका करावी. अन्यथा तोच कांदा तुमच्या तोंडावर फेकून मारू अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊतांच्या टीकेवर दिली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मालेगाव येथील ठाकरे गटाच्या जाहीर सभेत शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका केली.


जळगाव तालुक्यातील वावडदा येथे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा अरे मिंधे असा एकेरी शब्दात उल्लेख केला. आम्ही दिलेले आधी मत पुन्हा कर. त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्यावर टीका कर नाहीतर तोच कांदा तुझ्या तोंडावर हाणून मारीन अशा आक्रमक शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. 


गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्यासारख्या माणसाला माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. दगड कोणत्या झाडाला मारले जातात की ज्याला फळ आहेत, मला फळ लागली आहेत त्यामुळेच राऊत माझ्यावर टीका करत आहेत असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.


मालेगावात आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली या सभेत संजय राऊत यांनी शेतकऱ्यांना भावना देणारे कांदे तसेच शिंदे व गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे अशी टीका केली होती या टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


मालेगावचा ढेकूण मारायला तोफेची गरज नाही; राऊत कडाडले


संजय राऊत यांनी जाहीर सभेत आक्रमक भाषण केले. मंत्री दादा भुसे यांना टोला लगावत संजय राऊत म्हणाले, ''सकाळपासून माध्यमांमध्ये बातमी सुरु आहे की, आज शिवसेनेची तोफ धडाडणार, मात्र या मालेगावचा ढेकूण ठेचायला तोफेची गरज नाही. मग मालेगावात आपण सभा घेत आहोत? मालेगावात सभा घेत आहोत कारण, देशाला आणि महाराष्ट्राला संदेश देण्यासाठी की, शिवसेना तुटलेली नाही. शिवसेना वाकलेली नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक मालेगावसह संपूर्ण महाराष्ट्र शिवसेनेच्या पाठीशी आहेत. कांद्याला भाव नाही. कांदा रस्त्यावर फेकला जात आहे. मात्र आपल्याला त्या सुहास कांदेला रस्त्यावर फेकायचंय, अशा शब्दात राऊत यांनी टीकास्त्र सोडले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Uddhav Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत ...त्यांचा अपमान सहन करणार नाही; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा