जळगाव : शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सांगतील ती पूर्वदिशा असेल. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, घरी बसा तर आम्ही घरी बसू, त्यांनी सांगितलं की, निवडणूक अपक्ष लढवा तर अपक्ष लढवू. आणि त्यांनी सांगितले तर भाजपसोबत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवा तर भाजपच्या (BJP) चिन्हावर निवडणूक लढवू असे वक्तव्य आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी केले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचा आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत. या विषयावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. किशोर पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांना अपात्रतेची कारवाई ही होणारच नाही. ते अपात्र होणार नाहीत, अशी एक हजार एक टक्के शक्यता आणि मला विश्वास आहे. मात्र अपात्र झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आमदार म्हणून आम्हा सर्वांना मान्य असेल, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, घरी बसा तर आम्ही घरी बसू, त्यांनी सांगितलं की, निवडणूक अपक्ष लढवा तर अपक्ष लढवू. आणि त्यांनी सांगितलं तर भाजपसोबत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवा तर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू अस आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, काल जळगाव (Jalgaon Bus Accident) बांबरुड या बसचा रॉड तुटला. त्यांनतर बस चालकाच्या सतर्कतेमुळे पन्नास प्रवाशांचे प्राण वाचले तरी यानंतर संबंधित प्रवाशांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला असता त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवाशांना तसेच चालकांला शिवीगाळ केली. या घटनेवर बोलताना किशोर पाटील म्हणाले की,  संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, महामंडळ (ST) प्रशासनाकडून प्रवाशांच्या प्रवाशाची जबाबदारी असते, मात्र अशा पद्धतीने प्रवाशांनी संपर्क केल्यावर संबंधित वरिष्ठ अधिकारी शिवीगाळ करत असेल तर कारवाई होणे अपेक्षित आहे. संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन तसे आदेश दिले जातील, असे यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितलं.


तसेच पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन (Sandip Mahajan) मारहाण प्रकरणावर आमदार किशोर पाटील म्हणाले की हा विषय आत्ता माझ्यासाठी संपला असून यापूर्वी देखील या प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचे सांगितले होते, मात्र विरोधकांना काम नसल्याने उठसूट काहीही बरळत असतात, माझ्या लेखी काह विषय संपल्याचे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले. 


जळगाव बस अपघात 


जळगाव ते पाचोरा तालुक्यातील बांब्रुड गावासाठी सायंकाळच्या सुमारास जळगाव डेपोची बस निघाली होती. ही बस धावत असताना शिरसोली गावाजवळ तिच्या पुढील चाका जवळचा रॉड तुटल्याने बस खाली झुकली. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मात्र, समयसूचकता दाखवत अनुभवी असलेल्या चालक हेमंत पाटील यांनी बस कशी तरी रस्त्याच्या बाजूला लावण्यास यश मिळविले. मोठा अनर्थ टाळल्याने  बसमधील प्रवाशांनी चालक पाटील हे आमच्या साठी देवदूत ठरल्याच्या प्रतिक्रिया दिली आणि त्यांचं टाळ्या वाजून आभार मानले. मात्र, पुढील प्रवासासाठी पर्यायी बस मागणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Politics: कधी कुणाला मारहाण, कधी शिवीगाळ; मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांवर कारवाई का होत नाही?विरोधकांचा सवाल