जळगाव : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) पत्रकार मारहाण प्रकरणावरून राजकारण चांगेलच तापले असून आता आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्या समर्थकांकडून मोर्चा काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि आमदार किशोर पाटील यांची बदनामी केल्याच्या प्रकरणी पत्रकार संदीप महाजन (Sandeep Mahajan)  यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार किशोर पाटील समर्थकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. 


शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला (Journalist) मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला. तसेच माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षणाची मागणी देखील केली होती. तर दुसरीकडे  आमदार किशोर पाटील यांनी आपण फक्त शिवीगाळ केली, मारहाण केली नसल्याचे सांगत ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत आपण उत्तर दिले असल्याचे त्यांनी म्हटल होते.


युट्युबवरील बातमीवरून हे प्रकरण वाढत गेले, त्यानुसार आमदार किशोर पाटील आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला. यावरूनच संबंधित पत्रकाराला मारहाण करण्यात आली. आता या प्रकरणी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांच्या कडून पाचोरा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला आहे. पाचोरा शहरातील पत्रकार संदीप महाजन हे खंडणीखोर पत्रकार असल्याचा आरोप करीत त्यांनी आता आमदार किशोर पाटील आणि मुख्यमंत्री यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकप्रतिनधीं असलेल्या नेत्यांची बदनामी केल्याच्या कारणावरून पत्रकार संदीप महाजन यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी आमदार किशोर पाटील समर्थकांच्या वतीने आज पाचोरा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. 


नेमकं प्रकरण काय?


जळगाव जिल्हा सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी बातमी केली होती. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यापर्यत बातमी गेल्यानंतर संबंधित पत्रकार आणि आमदार किशोर पाटील यांच्यात संवाद झाला. यात पत्रकारास शिवीगाळ केल्याचे समोर आले. त्यानंतर किशोर पाटील यांच्या समर्थकांकडून गुरुवारी (10 ऑगस्ट) रोजी पत्रकार महाजन यांना मारहाणही करण्यात आली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Jalgaon Crime : यूट्यूबवरची बातमी, आमदारांचा संताप, पत्रकाराला मारहाण, जळगाव प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?