जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील तीन-तीन कॅबिनेट मंत्री असताना, पशुवैद्यकीय महाविद्यालय असेल, पोलीस प्रशिक्षण केंद्र असेल, यासारखे प्रकल्प बाहेर जिल्ह्यांमध्ये कसे पळवले जातात. अकेला ही एकनाथ खडसे भारी था, पटापट मंजुरी आणि शेकडो कामे प्रत्यक्षात आणले, उभे केले. तीन तीन मंत्री असताना बहिणाबाईंचे स्मारक उभे करून दाखवा, असे थेट आव्हान एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जिल्ह्यातील मंत्र्यांना केले आहे. 


नुकतीच जळगाव जिल्हा नियोजन बैठक पार पडली. यावर एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, संपूर्ण जिल्हा नियोजन समितीची बैठक ही फक्त एकनाथ खडसेवर झाली. जिल्हा नियोजन बैठकीत जी चर्चा झाली, जो माझा निषेध ठराव झाला, जिल्हा नियोजन बैठकीत एकनाथ खडसेबद्दल चर्चा का? विकास कामांची चर्चा करणे आवश्यक आहे. यावरून असं दिसून येत की, एकटा एकनाथ खडसे सर्वांना भारी आहे, असे निषेध ठरावावर बोलताना आमदार एकनाथ खडसे यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन ((Girish Mahajan) यांना प्रतिआव्हान दिले. तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला, हा चुकीचा आहे. एका अधिकाऱ्याने सांगावे की, मी ब्लॅकमेल केले. मात्र जे अधिकारी काम करणार नाही, त्यांना वठणीवर आणण्याचे काम मी करेल असा इशारा खडसे यांनी यावेळी दिला. 


जिल्ह्यात अनेकदा जी विकास कामे झाली, त्यांचे टेंडर अधिक काढून किंमत वाढवले जाते. शहरात सर्व कामे हे एका विशिष्ट ठेकेदाराला का दिली जात आहे. मात्र हे सगळे आमदार आणि मंत्री हे लाभार्थी असल्यामुळे बोलू शकत नाही. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम हे सर्व आमदार करत आहेत. म्हणून जळगाव शहरातील महापालिका, नगरपरिदेच्या सगळे कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाला का दिले जातात, असा सरळ आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. सरकारकडे जर तुमची पत असेल ठेकेदारांच्या बिलांचे थकलेले तीनशे कोटी रुपये आणून दाखवा, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी तीनही मंत्री व सर्व आमदारांना दिले आहे.


अकेला ही एकनाथ खडसे भारी था... 


कापूस प्रश्नावर एकनाथ खडसे म्हणाले की, गेल्या काळात कापसाला भाव देईन, असे सांगणाऱ्या गिरीश महाजन यांची आता का हनुवटी गेली. आता का दातखिळी बसली. कापसाच्या प्रश्नावर सरकारमधील एकही आमदार बोलायला का तयार नाही. जळगाव जिल्ह्यातील एकही आमदाराने कापसाचा प्रश्न विचारला का? असा सवाल करत एवढ्या जर तुम्ही भानगडी करता, निषेधाचे ठराव करतात तर कापसासाठी तुमची प्रतिष्ठा वापरा ना? गिरीश भाऊ यांना म्हणा वापरा..ना तुमची पत आणि प्रतिष्ठा असा थेट खोचक सवाल एकनाथ खडसे यांनी केला. तसेच जळगाव जिल्ह्यातील तीन-तीन कॅबिनेट मंत्री असताना, पशुवैद्यकीय महाविद्यालय असेल, पोलीस प्रशिक्षण केंद्र असेल, यासारखे प्रकल्प बाहेर जिल्ह्यांमध्ये कसे पळवले जातात. अकेला ही एकनाथ खडसे भारी था, पटापट मंजुरी आणि शेकडो कामे प्रत्यक्षात आणले, उभे केले. तीन तीन मंत्री असताना बहिणाबाईंच्या स्मारक उभे करून दाखवा, उभारू नका, मात्र त्यांची अवहेलना होईल, असे तरी काम करू नका असा सज्जड दमच एकनाथ शिंदे यांनी दिला. 


देवेंद्र फडणवीस हेच वरचढ 


तर फडणवीस यांच्यावर खडसे यांनी जोरदार टीका केली.  ते म्हणाले की, सर्व जण एकमेकांच्या कुरघोड्या करण्यामध्ये व्यस्त आहे. राष्ट्रवादीचे कृषिमंत्री घोषणा करू शकत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून कांद्याबाबत घोषणा केली. राष्ट्रवादीचे कृषिमंत्री असले, मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्या दोघांना काहीच किंमत नाही. देवेंद्र फडणवीस हेच वरचढ आहेत. फडणवीस यांनी घोषणा केल्यावर ती मान्य करावीच लागेल, अशी एकनाथ शिंदे यांची मजबुरी आहे. याउलट उपमुख्यमंत्री अजित पवार थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतात. बाहेर देशात असताना देवेंद्र फडणवीस कांद्याचे भाव ठरवतात. मग इकडे राष्ट्रवादीच्या कृषीमंत्र्याला शून्य किंमत असल्याचे खडसे म्हणाले. 



शरद पवार यांच्या सभेला गर्दी होईल.... 


शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली. जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने शरद पवारांचा दौरा हा फार महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश व्हावा, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. गर्दी जमवण्याचा काम नाही, गर्दी आपोआपच होईल, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाप्रमाणे आम्ही काही लोकांसाठी एसटी बस किंवा गाड्या केलेला नाहीत. बसेस वाहने लावून तसेच अंगणवाडी, ग्रामसेवक यांना भत्ते देऊनही शासन आपल्या कार्यक्रमांना गर्दी होत नाही. मात्र यांच्या कार्यक्रमाच्या गर्दीपेक्षा निश्चितच शरद पवार यांच्या सभेला जास्त गर्दी होईल, असा मला विश्वास आहे.


माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.... 


एकीकडे आमच्यासोबत द्वेषबुद्धीने वागायचं आणि दुसरीकडे रश्मी शुक्ला तुमच्या आश्रयाला आल्या म्हणून त्यांची सोडवणूक करायची हे म्हणजे भाजपच वॉशिंग मशीन जोरात सुरु असल्याचे चिन्ह आहे. शासनाने रश्मी शुक्ला यांच्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट सादर केला. यानंतर एकनाथ खडसेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. खडसे म्हणाले की, वास्तविक अजूनही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, असे असतानाही सरकारने क्लोजर रिपोर्ट दिला. माझा फोन टॅप केला, त्याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशनातून प्रश्न विचारला. मात्र त्याचे उत्तर मला दिलं नाही. उलट शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली. आमचं म्हणणं न ऐकता, आम्हाला उत्तर न देता सरकार परस्पर क्लोजर रिपोर्ट सादर करत आहे. ज्याप्रमाणे रश्मी शुक्ला यांचा सरकारने क्लोजर रिपोर्ट पाठवून आग्रहपूर्वक त्यांना निर्दोष करून आणल. एकनाथ खडसे यांचा क्लोजर रिपोर्ट गृहमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. मग तो क्लोजर रिपोर्टसुद्धा कोर्टाला स्वीकारायला लावा, उलट इन्क्वायरी चौकशी का लावतात असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. 


इतर महत्वाची बातमी : 


Girish Mahajan vs Eknath Khadse : सेना-भाजप युती कुणामुळे तुटली? खडसे-महाजन आमनेसामने