Jalgaon News Update : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्टेशन नजीक वागळे गावाजवळ धावत्या एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेसला ही घटना घडली आहे. 


लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस ( गाडी नंबर 12141) ही मुंबईकडून भुसावळकडे जात असताना चाळीसगाव स्टेशन नजीक वाघळी गावाजवळ या धावत्या एक्सप्रेसचे इंजिन आणि डबे वेगवेगळे झाले. गाडी धावत असतानाच ही घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण  निर्माण झाले होते. 


घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डबे सोडून पुढे गेलेले इंजिन परत मागे आणण्यात आणि ते पुन्हा वेगळे झालेल्या डब्यांना जोडण्यात आले. 


या घटनेनंतर एक्सप्रेस मधील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. प्रसंगावधान राखून सर्व नागरिक गाडीतून बाहेर पडले.  दरम्यान, घटनेतील प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुठलीही जिवित हानी झाली नाही. 


रेल्वे प्रशासनाकडून दुर्घटना घडलेल्या रेल्वेचे डबे आणि इंजिन जोडून दुरूस्तीसाठी गाडी भुसावळ येथे हलवण्यात आली आहे. परंतु, या घटनेमुळे प्रवाशांमधून संपात व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने घटनेत कोण्यात्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतु, या घटनेकडे डोळेझाक करून चालणार नाही, अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून येत आहेत. दैव बलवत्तर म्हणूनच आमच्या जीवाला कोणाताही धोका पोहोचला नाही. परंतु, जर या घटनेत दुर्दैवी घटना घडली असती तर त्याला कोण जबाबदार असते? असे प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केले जात आहेत. 


महत्वाच्या बातम्या


kini Toll Plaza MNS aandolan : मुदत संपूनही टोलवसूली सुरुच, मनसेकडून किणी टोल नाक्यावर आंदोलन 


Pune Crime News: दहशत निर्माण करणाऱ्या चुहा गँगच्या म्होरक्यासह साथीदारांच्या आवळल्या मुसक्या; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई