जळगाव: बळीराजावर कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट असतंच या सगळ्यातून सावरत तो पुन्हा उभा राहातो पण त्याच्या हाती कवडीमोल भाव येतो. अशावेळी उद्विग्न झालेल्या बळीराजानं आपलं बाजारात विक्रीसाठी आलेलं पिक संतापानं फेकून दिलं आहे. जळगावमध्ये (Jalgaon News) शेतकऱ्यांना भाजीपाल्यासाठी कवडीमोल भाव मिळत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. कष्टानं पिकवलेल्या भाजीचे दर  मिळत नसल्यानं अखेर शेतकऱ्यानं भाजी रस्त्यावर फेकून दिली आहे.


  पाऊस नसतानाही अडचणींचा सामना करत शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला खरा पण बाजार समितीमध्ये केवळ पाच रुपये किलो दराने हा भाजीपाला विकला जात असल्यानं भाजीपाला फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जळगाव जिल्ह्यात महिनाभर पाऊस नव्हता. त्या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून भाजीपाला पिकवून बाजारात आणला. पण मातीमोल भाव मिळाल्याने टोमॅटो, गिल्के, वांगी, दोडके, मिरच्या, गंगाफळ आदी भाज्या फेकून दिल्या. दरम्यान, भाज्यांची वाढलेली आवक आणि ग्राहक नसल्याने भाव पडल्याचं व्यापारी सांगत आहेत. 


पाच रुपये किलो दराने भाजीपाला विक्रीसाठी


गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यात पाऊस नसतानाही मोठ्या अडचणीचा सामना करत शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला. मात्र बाजार समितीमध्ये केवळ पाच रुपये किलो दराने भाजीपाला विकला जात आहे. यामध्ये खर्चही निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून देत आपला संताप व्यक्त केला आहे. जळगाव जिल्ह्यात महिना भर पासून पावसाने दडी मारली आहे. या परिस्थतीमध्ये भाजीपाला पिकवणे शेतकऱ्यांच्या मोठे अडचणीचे ठरले आहे. तरीही या  परिरिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा वापर करत शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचे रान करून भाजीपाला पिकून बाजारात आणला. खरेदी करायला तयार नसल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर होऊन काहींनी आपला भाजीपाला बाजारात फेकून देत आपला संताप आणि व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


बळीराजा हतबल


पाऊस नसताना ही शेतमालाची मोठी आवक वाढली असताना ही भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहक नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं अडत व्यापारी सांगत आहेत. जळगाव बाजार समित्यासह किरकोळ बाजारात सर्वच भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर निम्म्याहूनही खाली उतरल्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. मोठ्या कष्टानं सगळ्या संकटातून सावरत पिक उभं केलं आणि त्याला कवडीमोलही भाव मिळत नसल्यानं शेतकरी निराश झाला आहे. शेतकऱ्यानं भाजी रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला आहे.


हे ही वाचा :


तब्बल 27 दिवसानंतर पाऊस, ढोल ताशांच्या गजरात नाचून शेतकरी कुटुंबांनं व्यक्त केला आनंद