Jalgaon : दहीहंडी फोडताना पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज (दि.28) जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा येथे घडलीये. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाचे (Congress Party) पाचोऱ्याचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी (Sachin Somvanshi) यांनी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परिवारास मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
हीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना तो डोक्यावर कोसळला
काल गोकुळाष्टमी पार्शवभूमीवर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेस पाचोरा शहरात स्टेशन रोड वरील रिक्षा स्टॉपवर देखील काही रिक्षा चालकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. काल रात्रीच्या सुमारास ही दहीहंडी फोडण्यासाठी नितीन चौधरी हा रिक्षा चालक गोविंदाने पुढाकार घेतला. मात्र दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना तो डोक्यावर कोसळल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला होता.
मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी
त्याला तातडीने रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नितीन चौधरी हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरातील कर्ता गेल्याने या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील गंभीर झालाय. मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या