Jalgaon Accident: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील कोदगाव बायपास चौफुलीवर बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडलाय. दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सुदाम पवार आणि श्रावण माळी यांचा समावेश असून, दोघेही स्थानिक रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. (Accident News)
नेमकं घडलं काय?
चाळीसगावमधील कोदगाव बायपास चौफुलीवर बुधवारी सकाळी दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सुदाम पवार आणि श्रावण माळी या दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि पिकअप उलटून रस्त्यावरच आडवी झाली.
अपघातानंतर पिकअपचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली. पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहनाचा आणि फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.
वाहनाचा चक्काचूर, दुचाकीस्वार लांब फेकले गेले
जळगावच्या चाळीसगावमध्ये बायफास रोडवर झालेल्या या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झालाय तर पिकअप वाहनही उलटून रस्त्याच्या कडेला गेलं. यात दुचाकीस्वार लांब फेकले गेले. या घटनेमुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, अपघात घडल्यानंतर पिकअपचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी अज्ञात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु असून, प्राथमिक माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या परिसरात या अपघातामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला आणि जखमी अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वारांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
हेही वाचा