Kalyan Hospital Receptionist Case: कल्याण पूर्वमधील नांदिवली परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण (Kalyan Hospital Receptionist Case) करण्यात आली. याप्रकरणी परप्रांतीय आरोपी गोकुळ झा या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. गोकुळ झा याचा भाऊ रंजीत झा याला देखील पोलिसांनी अटक केली.

कल्याण न्यायालयात आज या दोघांना हजर करण्यात आलं. त्यानंतर गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत झा यांना कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.कल्याण न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस आता आरोपी गोकुळ याने या तरुणीला का मारहाण केली या गोकुळचे आणखी किती गुन्हे आहेत याबाबत पोलीस अधिक तपास करणार आहेत.

मारहाणीत तरुणीचे कपडे फाटले-

संबंधित डॉक्टरांकडे काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बसले होते. त्यामुळं रिसेप्शनिस्टनं गोपाल झा नावाच्या तरुणाला थांबण्यास सांगितलं. पण तो तरुण जबरदस्तीनं डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रिसेप्शनिस्टनं अडवलं असता त्या तरुणानं तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिचे कपडे फाटले आणि तिला जबर दुखापत झाली. यादरम्यान आता आरोपी गोकुळ झा आणि रंजीत झा यांच्या आई-वडिलांनी घडलेल्या सदर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

घडलेली घटना योग्य नाही- 

गोकुळ झा आणि रंजीत झा या आरोपींचे आई-वडील मानपाडा पोलीस ठाण्यात हजर झाले असून त्यांनी संपूर्ण प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, घडलेली घटना योग्य नाही, ज्याने हा प्रकार केला आहे त्याला शिक्षा होईलच. मात्र माझा मोठा मुलगा रंजीत झा हा निर्दोष आहे, असं त्यांच्या वडिलांनी सांगितले. आई-वडिलांनी सांगितले की लहान मुलगा गोकुळ झा हा वाद करत असल्याचे त्यांनी पूर्वीही अनुभवले आहे. परंतु मोठा मुलगा रंजीत झा याची कोणतीही चूक नाही, असं त्याचे आई-वडिलांनी सांगितले. 

आई म्हणाली, रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी मारले-

सदर घटनेवर गोकुळ आणि रंजीत झा यांची आई म्हणाली की, सदर घटना माझ्या डोळ्यादेख घडली असून रिसेप्शनिस्ट तरुणीनेच आधी माझ्या सूनेवर हात उचलला. मुलीने माझ्या सुनेला शिवीगाळ केली होती. त्यानंतर तरुणीने माझ्या सूनेच्या कानाखाली मारली. हा सर्वप्रकार गोकुळ झाने पाहिले आणि बाहेरुन धावत येत त्याने तिला लाथ मारली. मात्र त्याने मारहाण करणे योग्य नव्हते, असा स्पष्ट निर्वाळाही आईने दिला आहे. त्याचबरोबर, सीसीटीव्ही फुटेज कट करून दाखवले जात असल्याचा गंभीर आरोपही गोकुळच्या आईने केला आहे.

तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु-

सदर मराठी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जानकी रुग्णालयाचे डॉक्टर मोईन शेख यांनी म्हटलं की, तिच्या मानेवर मारहाण करण्यात आली आहे. ⁠तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत. तसेच तरुणीला मान हलवताना खूप वेदाना होत आहे. त्यामुळे या मारहाणीमुळे तिला पॅरालिसीस होण्याची शक्यता आहे. तरुणीला सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

संबंधित बातमी:

Kalyan Hospital Receptionist Case: गोकुळ झाने मराठी तरुणीच्या छाती-पोटावर लाथा-बुक्क्यांनी मारलं; आता डॉक्टरांची धक्कादायक माहिती, म्हणाले, पॅरालिसीस...