Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) पाचोरा तालुक्यातील (Pachola Taluka) नगरदेवळा येथील पिता पुत्रावर मधमाशांनी हल्ला (Honey Bee) केल्याची घटना घडली आहे. यात पित्याचा मृत्यू झाला असून जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सब्दर सैयद इस्माइल सैय्यद असे मयताचे नाव असून त्यांचा मुलगा आबिद सब्दर सैय्यद हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली होती. ते वृक्षारोपण करत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला होता. या घटनेत सयाजी शिंदे सुखरूप होते. आता एक दुसरी घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. पिता पुत्रावर मधमाशांनी हल्ला केला. यात वडिलांचा मृत्यू झाला आहे.
सब्दर सैयद इस्माइल सैय्यद व त्यांचा मुलगा आबिद सब्दर सैय्यद कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आज रोजी बनोटी शिंदोळ मार्गाने दुपारच्या दरम्यान नगरदेवळा येत होते. अचानक शिंदोळ रस्त्यावर दुचाळीवरून जात असताना झाडावर बसलेल्या मधमश्या अचानक उठल्या. या मधमाशांनी या ठिकाणाहून जात असलेल्या सब्दर ईकबाल सैय्यद व आबिद सब्दर सैय्यद यांच्यावर हल्ला केला. यात सब्दर ईकबाल सैय्यद यांचा जागीच मृत्यू झाला. तर, आबिद सब्दर सैय्यद याला जळगाव येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला
पुणे बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्यामुळे तेथील झाडे वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे सदर ठिकाणी गेले होते. यावेळी मधमाशांनी सयाजी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं. झाडांचं पुनर्रोपण करत असतांना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला.
सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड
अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड केली आहे. सयाजी शिंदे हे लोकांना झाडे लावण्याचा संदेश देतात. अभिनेते सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी काही वर्षांपूर्वी एका उपक्रमाची घोषणा केली होती. राज्यभरातील जी काही खुप जुनी झाडे आहेत, त्यांची माहिती एकत्र करण्यासाठी सह्याद्री देवराईकडून दोन मोबाईल नंबर देण्यात आले. त्या नंबरवर आपला जुन्या झाडासोबतचा झाडाला मिठी मारलेला फोटो आणि ते झाड किती वर्षे जुनं आहे, ते कुठे आहे, ही माहिती लिहून व्हॉट्सॲप करायची होती. त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.