Gold Price May Hike : जागतिक पातळीवर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सध्या वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या गुंतवणुकीमधून ग्राहकांना 22 टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांना ही सोने खरेदी परवडली आहे. सोन्याचे दर आगामी काळात तीन चार वर्षात लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता दिसत नाही, पण येत्या मार्च महिन्यापर्यंत मात्र सोन्याचे दर 70 हजार रुपयांच्या पर्यंत जाऊ शकतात.


सोन्याचा दर 70 हजार पार जाण्याची शक्यता


शेअर बाजार वधारला की, सोन्याचे दर घसरत असल्याचं नेहमी पाहायला मिळायचं. मात्र, गेल्या पाच-सहा महिने पासून हा ट्रेंड बदलला आहे. आपल्या देशातील शांततेचं वातावरण आणि चांगली अर्थव्यवस्था हे त्याची कारणं आहेत. त्यामुळे आपल्या देशात गुंतवणूक वाढून सोन्याचे दर आणि शेअर बाजार दोन्ही वधारलं असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात सध्या वाढ होताना दिसत आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत मात्र सोन्याचे दर 70 हजार रुपयांच्या पर्यंत जाऊ शकतात.


सोन्याचे दर विक्रमी पातळीवर


सोमवारी सोन्याचे दर हे सर्वाधिक विक्रमी पातळीवर म्हणजे जीएसटीसह 66000 हजार वर होते. मात्र, त्यानंतर आज सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घसरण होऊन 24 कॅरेट सोन्याच जीएसटीसह भाव 64800 रुपये प्रति तोळ्यावर आलं आहे. असं असलं तरी सध्याचा सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर असल्याचं ही जळगावमधील रतनलाल बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी म्हटलं आहे.


जळगावमध्ये सोनं 63 हजारांच्या पुढे


सुवर्ण नगरी जळगावमध्ये (Jalgaon Gold Price Today) आज शुद्ध 24 कॅरेट सोन्याचे दर 63100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जळगावमध्ये जीएसटीसह (GST) सोन्याची दर आज 6500 रुपये प्रति तोळा आहे. सोमवारच्या तुलनेनं आज सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक पातळीवरील घडामोडीचा परिणाम सोन्याचा दरावर होत असल्याचं मानलं जात आहे.


महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)



  • जळगाव - 63100 रुपये प्रति 10 ग्रॅम (Jalgaon Gold Rate)

  • पुणे - 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)

  • नाशिक - 24 कॅरेट सोने 64230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)

  • नागपूर - 24 कॅरेट सोने 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)

  • कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 64200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)