जळगाव : मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील बेलसवाडी (Belaswadi) येथे गुरांच्या गोठ्याला आग लागून सहा गुरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर तीन गुरे जखमी झाले आहे. तसेच तीन ट्रॅक्टर व अन्य शेतीला लागणारे अवजारे जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे (Farmer) लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे शेतकरी धनराज प्रजापती (Dhanraj Prajapati) यांच्या गुरांच्या गोठ्याला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत सहा गुरांचा होरपळून मृत्यू झाला. तर तीन गुरे जखमी देखील झाले. तसेच तीन ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे अवजारे जळून खाक झाली. 


शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका


ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला हा मोठा फटका बसला आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे शेतकरी धनराज प्रजापती यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अंतुरली दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या मदतीने आग पहाटेपर्यंत आटोक्यात आणली. मात्र प्रशासनाकडून या शेतकऱ्याला काही मदत मिळेल का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Akola News : कुठे शेतातल्या साहित्याची नासधूस, तर कुठे उभ्या पिकाला लावली आग; अकोल्यातल्या शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट


Air India Flight : एअर इंडियाच्या विमानात आग, 175 प्रवासी होते उपस्थित; दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती घोषित