मुंबई : जळगाव (Jalgoan) जिल्ह्यात रावेर आणि जळगाव असे दोन मतदारसंघ आहे. रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे इच्छुक आहेत. तसेच पक्षाने देखील आपल्याला याबाबत सूचना केल्याचं खडसेंकडून वारंवार सांगता येतं. त्यामुळे रावेर मतदारसंघातून (Raver Lok Sabha) राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवार असला तरीही जळगाव मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्याची कबुली एकनाथ खडसे यांनी दिलीये. 


रावेरमध्ये एकनाथ खडसे जरी तयार असले तरीही जळगाव मतदारसंघात उमेदवार शोधण्याची वेळ राष्ट्रवादी शरद पवार गटावर आलीये. असं असलं तरीही पक्षाअंतर्गत उमेदवार अद्याप तयार नाही, पण काही सामाजिक कार्यकर्ते या लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येतेय. तसेच या सामाजिक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली. पण अजूनही यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून उमेदवार देण्याची शक्यता आहे. 


एकनाथ खडसे यांनी काय म्हटलं?


जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून एकनाथ खडसे इच्छुक आहेत. त्यामुळे रावेर मतदारसंघाची जागा एकनाथ खडसे यांच्यासाठी निश्चित असल्याचं म्हटलं जातंय. पण जळगाव मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवार निश्चित नसल्याचं म्हटलं जातंय. यावर एकनाथ खडसे यांनी म्हटलं की,  जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्याकडे लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाचा एकही प्रभावी उमेदावर इच्छुक नाही. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचा एकही उमेदवार तयार नसल्याची कबुली देखील एकनाथ खडसे यांनी दिली. 


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यादृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दंड थोपटले आहेत. रावेर लोकसभेची (Raver Lok Sabha)  जागा पक्षाला मिळावी आणि ती मिळाल्यास उमेदवारीसाठी आपला विचार व्हावा अशी विनंती एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यानुसार पक्ष देखील एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं. 


हेही वाचा : 


Devendra Fadanvis : मी कारसेवक म्हणून अयोध्येत होतो, आता टीका करणारे त्यावेळी घरात बसून होते, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात