Jalgaon News : भाजपचे संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या ग्रामविकास मंत्री आणि जळगावातील (Jalgaon) पक्षाचे प्रमुख नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची तयारी भाजपाने (BJP) केली, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर आता गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "या सर्व खोट्या गोष्टी आहेत आहेत. मीही टीव्हीवरच बघतोय की माझं नाव खासदार म्हणून सुचवलं जातं आहे. असा कुठलाही विषय, चर्चा आणि निर्णय बैठकीत झालेला नाही, असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. एबीपी माझाशी बोलताना गिरीश महाजन यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.
एकनाथ खडसेंवर पलटवार
याचवेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. "तुम्ही माझ्यामागे मोका लावून चांगलं काम केलं," असं गिरीशी महाजन यांनी म्हटलं. "मी तर तुमच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीत, जे आरोप केले आहेत ते अंजली दमानिया यांनी केलेले आहेत म्हणूनच तुमची चौकशी झालेली आहे. आपला जावई जवळपास दोन-तीन वर्षापासून जेलमध्ये आहे, त्यांना जामीन मिळत नाही. आपलं कुटुंबीय कोर्टाने थांबवलं म्हणून सध्या बाहेर आहेत, त्याची कल्पना तुम्हाला आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर तो मोका लावला तो कसा लावला त्याची कल्पना मला आहे. तुमच्या मागे ईडी लागली आहे, हे सर्व लोक बघत आहेत. त्याचे पुरावे देखील आहेत. दहा दहा वेळा सुप्रीम कोर्टात जाऊन तुम्हाला त्यात जामीन मिळत नाही. तुमचा जावई हा गरीब माणूस आहे तो तुमच्यामुळे अडकला आहे. तुमच्या स्वार्थापायी त्याला अडकवण्यात आलं याचं दुःख मलाही आहे," असा पलटवारही मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केला आहे.
जागावाटपावरुन युतीमध्ये वाद नाही
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमध्ये (BJP) जागावाटपावरुन दावे प्रतिदावे होत आहे. याबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले की, "आमच्या युतीमध्ये जागा वाटपाबाबत कुठलाही वाद नाही."
गौतमी पाटीलविषयी बोलणं टाळलं
तर सध्या महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत आणि वादात असणारी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) विषयावर बोलणं गिरीश महाजन यांनी टाळलं.
हेही वाचा