जळगाव : राज्यात शिंदे सरकार लोकप्रियता वाढवण्यासाठी वारेमाप घोषणा करत आहे. मदत कागदावरच आहे, लोकांनी त्यांचा स्वीकार करण्यासाठी लोकप्रियता वाढवण्यासाठी शिंदे सरकार वारेमाप घोषणा देत असून या वारेमाप घोषणांची पूर्तता होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी केला आहे.


जळगाव (Jalgaon News Update ) येथील मुक्ताईनगर येथे रोहिणी खडसे यांच्या संवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.


"राज्यात शिंदे गट आणि भाजप युतीतील सरकार असलं तरी शिंदे गट व भाजप या दोघांच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रीपदे आहेत, मात्र ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्या शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठी  नाराजी आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं  त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थकांमध्ये नाराजी आहे, असे जयंत पाटील म्हणाले. 


सरकारने दिलेली मदत अजूनही कागदावरच आहे. ती मिळालेली नाही तर दुसरीकडे गोविंदांना नोकरीत आरक्षणाची घोषणा शिंदे सरकारने केली होती. मात्र त्याचीही पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शिंदे सरकार आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी वारेमाप घोषणा करत आहे. मात्र या घोषणांची पूर्तता करत नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला.


जयंत पाटील यांनी यावेळी  एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी त्यांच्या मतदारसंघात काढलेल्या संवाद यात्रेचेही कौतुक केले. तसेच राज्यभरात अशाच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जर संवाद यात्रा काढली तर राष्ट्रवादी पक्ष बळकट होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 


महत्वाच्या बातम्या


Sambhajiraje Chhatrapati: आमचा आवाज दाबल्याच्या आरोपाला संभाजीराजेंचे उत्तर; राजेंची रोखठोक पोस्ट 


Rohit Pawar On ED Investigation: 'केंद्रीय तपास यंत्रणांना मी आधीही सहकार्य केलं, आताही करेन', ईडी चौकशीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया