Jalgaon: अवैध रुक्ष तोड प्रकरणातील यावल वनविभागातर्गत दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर उलट आरोपींसह गावातील 20 ते 25 जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील पैझरीपाडा या गावात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
यावल वनविभागातर्गत कार्यालयात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी फरार आहेत. या आरोपींचा अटक करण्यासाठी बुधवारी वनरक्षक कृष्णा पाडुरंग शेळके, वनरक्षक गोवर्धन बब्रुवान डोंगरे, वनरक्षक जीवन बालाजी नागरगोजे यांच्या कर्मचारी यावल तालुक्यातील पैझरीपाडा या गावात गेले होते. यादरम्यान वनविभागाचे कर्मचारी आरोपींचा शोध घेवून कारवाई करत असतांना गावातील 20 ते 25 जणांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांला चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान महिला तसेच पुरूषांच्या जमावाने लाठ्या काठ्यांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यात वनरक्षक हे जखमी झाले आहेत.
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
याप्रकरणी वनरक्षक कृष्णा शेळके यांच्या तक्रारीवरुन रंगी रामसिंग पावरा, सुरेश किसन पावरा, झामसिंग मखना बारेला, बिलरसिंग झामसिंग बारेला, प्यारसिंग झामसिंग बारेला, सखाराम झामसिंग बारेला, ईना कमरा, बारेला सर्व सिमा सखाराम बारेला, रशीदा झामसिंग बारेला, मंजुराबाई सुरेश बारेला, सावळीबाई कमरु बारेला, व्यापारीबाई तुळशीराम बारेला रा. पैझरीपाडा ता.यावल, यांच्यासह 10 ते 15 महिला तसेच पुरूष यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.
संबंधित बातमी: