IPL 2020:  इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीझन साठी शनिवारी दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकाता नाइट राइडर्स यांच्यातील लढतीमध्ये किंग्ज इलेवन पंजाबच्या टीममध्ये काही बदल दिसायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी केकेआरची टीम कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

किंग्ज इलेवन पंजाब दुबईच्या शेख जायद स्टेडिअमवर केकेआरच्या विरूध्द प्ले ऑफच्या रेस मध्ये टिकून राहण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. पाच सामन्यातील तीन सामने जिंकणाऱ्या केकेआर आज आणखी एका विजयासह गुण तालिकेतील आपले स्थान बळकट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.


किंग्ज इलेवन पंजाबला आत्तापर्यंत एकूण सहा सामन्यापैकी पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी अजून एक किंवा दोन सामने हरल्यास त्यांना प्ले ऑफ मधून बाहेर जावे लागेल.


करो या मरो या स्थितीत असलेली किंग्ज इलेवन पंजाब टीम आज  ख्रिस गेलला खेळवण्याची पूर्ण शक्यता आहे. तो मयांक अगरवाल सोबत ओपनिंगला येईल. तर कर्णधार केएल राहुल आज तिसऱ्या नंबरवर खेळण्याची शक्यता आहे. एम. अश्विन आणि सरफराज खानचाही टीममध्ये समावेश होऊ शकतो.


केकेआरने मागिल सामन्यात राहुल त्रिपाठीला ओपनिंगला उतरवले होते. त्याने त्याचा पूर्ण फायदा उचलला होता. राहुल त्रिपाठी ने 81 धावा काढल्या होत्या.


संभाव्य संघ:


किंग्ज इलेवन पंजाब:


ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, केएल राहुल, निकोलस पूरन, सरफराज खान, मंदीप सिंह, मुजिब उर रहमान, एम अश्विन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, शेल्डन कोर्टेल


केकेआरचा  संभाव्य संघ
राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितिश राणा, इयोन मोर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पैट कमिंस, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती