Pune Rain news: मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या कुंडमळा पूल कोसळून (Indrayani Kundmala bridge collapse) रविवारी अनेक पर्यटक वाहून गेले होते. हा पूल कोसळला तेव्हा याठिकाणी तब्बल 100 पर्यटक उपस्थित असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) कालच्या बचावकार्यात 51 जणांना नदीतून बाहेर काढले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.अशातच आता इंद्रायणी नदीत ड्रोन द्वारे पाहणी केली जाणार. कोणी मिसिंग नाहीच, पण खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी फोन द्वारे दिली आहे. तर दुसरीकडे कुंडमळा येथून एक किलोमीटरवर एक बोट नदीत सोडली असून शेलरवाडी येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून हे सर्च ऑपरेशन केलं जातंय.
इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्या वैभवने काय सांगितलं?
अशातच या इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्यांनी या दुर्दैवी घटनेचा आणि ते कसे बचावले याबाबतचा घटनाक्रम सांगितला आहे. त्यातीलच एक वैभव उपाध्ये आणि वैशाली उपाध्ये आणि त्यांचे मुलं या ठिकाणी गेले होते. त्यातील वैभव अत्यंत अत्यावस्थ आहेत. वैभव हे अडीच तास पाण्यात होते. यावेळी ते पाण्यात वाहून जात जाता वाचले. त्यांच्या पायात देखील काही लोक अडकले होते. त्यांचा मुलगा सय्यम आणि सलोनी हे दोघे देखील होते. त्यात सय्यम याला पोहता येत असल्याने तो 200 मीटर गेल्यावर वाचला. त्यानंतर त्याने स्वत:ला वाचवलं असल्याचे ते म्हणाले.
..त्यावेळी पूल हलत होता, अन् क्षणात पूल कोसळला
तर त्यातील आणखी एक व्यक्ति गणेश पवार यांनी देखील या घटनेचा प्रसंग सांगितला आहे. यावेळी ते म्हणाले की, मी दुचाकीवर त्या पुलावर होतो, त्यावेळी पर्यटनासाठी आलेले दुचाकीस्वार समोरासमोर आले. त्यामुळं पर्यटक अडकून राहिले. त्यानंतर पूल हलत होता, अशात हा पूल कोसळला. मी लोखंडी पुलाला पकडून स्वतःची सुटका करून घेतली, त्यानंतर 3-4 पर्यटकांना ही बाहेर काढलं. असे ते म्हणाले.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित होतात?
- इंद्रायणी नदीवरचा पूल कमकुवत झाल्यानं त्यावरून ये-जा करण्यास मनाई होती, मग पर्यटक पुलावर कसे काय चढले?
- पर्यटकांनी पुलावर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कोणाला जबाबदारी दिली होती? अन् ते रविवारी कुठं होते?
- हा पूल दीड वर्षांपूर्वी वापरासाठी बंद केला होता, तर तेंव्हापासून पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही?
- गेल्या दीड वर्षात नवा पूल उभारायला सुरुवात का झाली नाही?
- आता 10 जूनला टेंडर आणि वर्क ऑर्डर काढल्याचा दावा आहे, पण गेली दीड वर्ष ही दिरंगाई कोणामुळं?
आणखी वाचा