न्यूयॉर्क : जगभरातील अनेक दिग्गजांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतीय वंशाचे प्रसिद्ध शेफ फ्लॉएड कार्डोज यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे राहणारे कार्डेज या महिन्यात मुबंईतही आले होते. मुंबईत त्यांनी आपल्या जवळच्या मंडळींसाठी एका पार्टीचंही आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांची कार्डोज यांच्या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे. अमेरिकेतही कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. आतापर्यंत येथे 773 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात 11 जणांचा मृत्यू झाला आहे.


कार्डोज यांच्या पार्टीत 200 जणांचा सहभाग

फ्लॉएड कार्डोज यांचे शेज फ्लॉएड, बॉम्बे कँटीन आणि ओ पेड्रो नावाचे रेस्टॉरंट आहेत. काही दिवसांपूर्वी कार्डोज मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या पार्टीत जवळपास 200 जण सहभागी झाले होते. मुंबईतील काम संपवून कार्डेज पुन्हा अमेरिकेत परतले होते. त्यानंतर ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली, त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना माहिती गोळा करण्यात आली.


कोरोनामुळे न्यूयॉर्कमधील स्थिती गंभीर


अमेरिकेत आतापर्यंत 54 हजार 428 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 773 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांपैकी 26,430 जण एकट्या न्यूयॉर्क शहरातील आहेत. न्यूयॉर्कमध्ये 271 जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूजर्सीमध्ये 3675 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी 44 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी अमेरिकेत एका दिवसात 197 जणांचा मृत्यू झाला.


 ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रिन्स चार्ल्स यांचे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत. ते आधीपासूनच स्कॉटलंडमध्ये आयसोलेशनमध्ये आहेत. तर त्यांची पत्नी कॅमिला यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी चार्ल्स यांनी मोनकोचे प्रिंस एल्बर्ट यांची भेट घेतली होती. प्रिन्स एलबर्ट हे देखील आधीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती.


संबंधित बातम्या :