नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे सर्वजण आपापल्या घरात बसून आहेत. तर, अनेकजण व्रर्क फ्रॉम होम करत आहेत. या काळात ऐकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे. यात व्हिडीओ कॉलिंग अॅप्सला जास्त मागणी होत आहे. झूम क्लाउड मीटिंग अॅप हे त्यापैकीच एक आहे. सध्या या अॅपला प्रचंड मागणी आहे. अगदी शाळा, महाविद्यालयापासून मोठमोठ्या कंपन्या, सरकारी बैठका या व्हिडिओ मिट झूम अॅपच्या माध्यमातून होत आहे. मात्र, या अॅप सुरक्षित नसल्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत.


कोरोनाच्या संकटानंतर व्हिडिओ मिट झूम अॅप भारतात लोकप्रिय होत आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिल्यानंतर अनेक शिक्षकांनी या अॅपच्या माध्यमातून शिकवणी सुरू केली आहे. तर, अनेक आयटी कंपन्या आणि काही सरकारी अधिकारी देखील या अॅपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करत आहेत. मात्र, हे धोकादायक असल्याच्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. तुमच्या खासगी माहितीची विक्री काळ्या बाजारात होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. "हॅकर्सनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झूम अॅपच्या वापरकर्त्याच्या पडद्यावर अश्लील सामग्री पोस्ट केल्याचीची घटना घडली होती. बऱ्याचवेळा वापरकर्ते व्हिडीओमधून खासगी गोष्टींचा खुलासा करत असतात. यात पासवर्ड, ईमेल यांच्या सारखा महत्वाची माहिती लिक होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Coronavirus | लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नाही, टेस्टिंग सर्वात मोठं शस्त्र : राहुल गांधी

ब्लॅक मार्केटमध्ये माहिती विक्री
आज मोठ्या प्रमाणात डिजीटल वापरकर्त्यांची खासगी माहिती ब्लॅक मार्केट म्हणजेच काळ्या बाजारात विकली जात आहे. यात बऱ्याचवेळा हेरगिरी करण्यासाठी मोबाईल अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. काही वर्षांपूर्वी एका दाम्पत्याच्या घरातील स्मार्ट टिव्ही हॅक करुन एकाने दाम्पत्याची खासगी आयुष्य चित्रीत केलं होतं. पोर्न वेबसाईटसाठी असा कंटेन्ट वापरला जातो. तर, अनेक देशातील गुप्त माहिती काढण्यासाठी शत्रू राष्ट्रांकडूनही अशा खेळी खेळल्या जातात. सध्याच्या काळात जवठळपास सर्वांकडेच मोबाईल आहे. त्यामुळे या मोबाईलच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या गोष्टी चोरल्या जातात. फेसबुक अॅनालिटीका प्रकरण त्यापैकीच एक आहे. अशा डेटाची काळ्या बाजारात मोठी किंमत असते. त्यामुळे अनेक हॅकर्स पैशासाठी अशा अॅप्सच्या मदतीने वापरकर्त्यांच्या माहितीची चोरी करतात.

Coronavirus | Rahul Gandhi PC | लॉकडाऊन म्हणजे पॉझ बटण, कोरोनावरील उपाय नाही : राहुल गांधी