Ziona Chana Death News : 39 बायका, 94 मुलं, 33 नातवंडं असलेल्या जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाचं निधन झालं आहे. मिझोरममधील जिओना चाना असं या सर्वात मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव आहे. ते 76 वर्षांचे होते. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. वृत्तसंस्था ANI नं याबाबत माहिती दिली आहे. जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख असणारे जिओना चाना आणि त्यांचं कुटुंब मिझोरममध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी ते आकर्षिक केंद्र होतं.


मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून जिओन चाना यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जिओन चाना यांच्यामुळे मिझोरम आणि बकटावंग तलंगनुम हे त्यांचे गाव राज्याच्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण झालं होतं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी म्हटलं आहे.






माहितीनुसार जिओन यांचं कुटुंब जगातील सर्वात मोठं कुटुंबं आहे. त्यांचं घर चार मजली असून जवळपास 100 खोल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील महिला शेती करतात. जिओना यांची सर्वात मोठी पत्नी मुख्य जबाबदारी सांभाळत आहे. या मोठ्या कुटुंबात घरातील सर्व सदस्यांना कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.


एका रिपोर्ट्सनुसार जिओना चाना यांचा जन्म 21 जुलै 1945 रोजी झाला होता. वयाच्या 17  व्या वर्षी त्यांनी पहिलं लग्न केले होते. त्यांची पत्नी जथियांगी वयाने त्यांच्यापेक्षा 3 वर्षाने मोठी होती.. त्यांचा पूर्ण परिवार या 100 खोल्यांच्या घरात एकत्रित राहतो. त्यांच्या कुटुंबात 200 हून अधिक लोक राहतात. हा पूर्ण परिवार आत्मनिर्भर आहे. यातील अनेक सदस्यांचा काही ना काही व्यवसाय आहे, अशी माहिती आहे.