मुंबई : राजीव गांधी ट्रस्टला दिलेल्या देणगीचं प्रकरण ताज असतानाच झाकीर नाईक यानं भारत सरकारला उद्देशून एक पत्र लिहलं आहे. त्या पत्रात झाकीरनं भारतावर असहिष्णुतेचा ठपका ठेवला आहे.


 

झाकीर नाईकचं भारतीयांना खुलं पत्र
"सध्याच्या काळात मुस्लिमांना लक्ष्य केलं जातंय. त्यासाठी मोठ्या लोकांना फसवलं जातंय. अद्याप मला समजलेलं नाही की माझा नेमका गुन्हा काय आहे? मला सरकार आणि प्रसारमाध्यमांनी टार्गेट केलंय. माझ्याविरुद्ध तपासयंत्रणांना कोणताच पुरावा मिळालेला नाही. सर्वात पहले सरकार माझ्याविरुद्ध अहवाल तयार करतं. त्यानंतर तो अहवाल मीडियामध्ये प्रसिद्ध केला जातो.

 

माझ्यावर धर्म परिवर्तनाचा आरोप लावण्यात आला. मात्र, सध्या जबरदस्तीने एखाद्याचा धर्म बदलणं खरंच इतकं सोपं आहे का?   

 

मी खरंच गुन्हा केला असेल तर मला शिक्षा द्या. मात्र, त्या आधी माझा गुन्हा काय आहे, हे तर मला सांगा. माझ्याविरुद्ध असा कट रचून भारतातल्या 20 कोटी मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली जातेय. याला भारताचा असहिष्णू चेहराच म्हणावा लागेल." - झाकीर नाईक


 

झाकीर नाईकच्या पत्रानंतर अद्याप सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.