नवी दिल्ली : बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांना ओळखपत्राची गरज नाही, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. ग्राहकांकडून ओळखपत्रांची झेरॉक्स जमा करण्यासंबंधी बँकांना कसलेही आदेश दिले नसल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया'ने हे वृत्त दिलं आहे. बँकेत पैसे बदलून घेताना कोणत्याही व्यक्तीला ओळखपत्र दाखवणं बंधनकारक आहे. मात्र त्याची झेरॉक्स देण्याची गरज नाही, असं आरबीआयने म्हटलं आहे.

दरम्यान सध्या सर्व बँकांकडून ओळखपत्राची झेरॉक्स जमा केली जात आहे. परिणामी ग्राहकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पैसे जमा करण्याचा फॉर्म आणि त्यासोबत ओळखपत्राची झेरॉक्स सध्या घेतली जात आहे.

बँकांकडे ग्राहकांची केवायसी अगोदरच झालेली असते. त्यामुळे ओळखपत्र पुन्हा घेण्याची काहीही आवश्यकता नाही, असं एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं. मात्र सध्या बहुतांश बँकांत झेरॉक्स कॉपी अनिवार्य आहे. परिणामी ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहेत.

ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक बँकांनी सध्या ग्राहकांना रांगेतच झेरॉक्स कॉपी पुरवण्याची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे.

संबंधित बातमी : तुमच्या जवळच्या ATM बाहेर रांग आहे का? इथे शोधा!