नवी दिल्ली : अनुदानित गॅस सिलेंडरच्या (एलपीजी) किंमतीत यापुढे दर महिन्याला 4 रुपयांनी वाढ होणार असून गॅस सिलेंडरवर देण्यात येणारं अनुदान मार्च 2018 पर्यंत पूर्णपणे रद्द होणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी आज याबाबतची माहिती दिली.
दर महिन्याला अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 4 रुपयांनी वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आहेत सरकारचे नवे आदेश
धर्मेंद प्रधान यांनी याबाबतची माहिती लोकसभेत लेखी स्वरुपात दिली. सरकारने हे आदेश 30 मे 2017 रोजीच दिले होते. यामध्ये तेल कंपन्यांना 1 जून 2017पासून दर महिन्याला प्रति सिलेंडरमागे 4 रुपये वाढवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश मार्च 2018 किंवा सिलेंडरवर दिलं जाणारं अनुदान संपेपर्यंत लागू असणार आहेत.
सरकारी तेल कंपन्या (इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम) यांना सिलेंडर अनुदान मार्च 2018 पर्यंत संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिलेंडरवर देण्यात येणार अनुदान पूर्णपणे रद्द करण्यासाठी सरकार मागील अनेक दिवसांपासून तयारी करत आहे. 1 जुलै 2016 पासून एलपीजी सिलेंडरवर दर महिन्याला 2 रुपये वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आतापर्यंत एकूण 10 वेळा सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत.
एका कुटुंबाला किती अनुदानित सिलेंडर?
देशातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एकूण 12 अनुदानित सिलेंडर मिळतात. यानंतर सिलेंडर हवा असल्यास तो बाजारभावानं विकत घ्यावा लागतो.
मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत किती?
मुंबईमध्ये अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत (14.2 किलो) 488 रुपये आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 554 रुपये आहे. म्हणजेच विनाअनुदानित सिलेंडरसाठी 66 रुपये जादा मोजावे लागतात. यापुढे 66 रुपये मिळणारं अनुदान टप्प्याटप्प्यानं कमी होत जाणार असून मार्च 2018 पर्यंत 554 रुपयांना सर्वांना सिलेंडर खरेदी करावं लागणार आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिलेंडरच्या किंमतीत दर महिन्याला वाढ, मार्च 2018पर्यंत अनुदान रद्द!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2017 08:41 PM (IST)
अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत दर महिन्याला वाढ होणार असून मार्च 2018पर्यंत सिलेंडरवरील अनुदान पूर्णपणे रद्द होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -