मुंबई : गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता, स्वराज इंडियाचे नेते आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली आहे. यादव यांनी तीन शक्यता वर्तवल्या असून निवडणुकांमध्ये काँग्रेस बाजी मारण्याची चिन्हं वर्तवली आहेत.
योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलेली पहिली शक्यता : (अधिक शक्यता) भाजप 43 टक्के मतं, 86 जागा काँग्रेस 43 टक्के मतं, 92 जागा योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलेली दुसरी शक्यता : भाजप 41 टक्के मतं, 65 जागा काँग्रेस 45 टक्के मतं, 113 जागा योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलेली तिसरी शक्यता : भाजपचा याहून दारुण पराभव
शक्यता/मतदारसंघाचे प्रकार ग्रामीण (98 जागा) निमशहरी (45 जागा) शहरी (39 जागा) एकूण (182 जागा)
2012 विधानसभा निवडणुकांत जिंकेलल्या जागा भाजप 44 काँग्रेस 49 भाजप 36 काँग्रेस 8 भाजप 35 काँग्रेस 4 भाजप 115 काँग्रेस 61
पहिली शक्यता : सीएसडीएस आण एबीपीच्या पोलनुसार भाजप 28 काँग्रेस 66 भाजप 26 काँग्रेस 19 भाजप 29 काँग्रेस 10 भाजप 83 काँग्रेस 95
दुसरी शक्यता : सीएसडीएसच्या पोलनंतर 2 टक्के बदल भाजप 20 काँग्रेस 74 भाजप 18 काँग्रेस 27 भाजप 27 काँग्रेस 12 भाजप 65 काँग्रेस 113
https://twitter.com/_YogendraYadav/status/940876152922570753 योगेंद्र यादव यांनी ट्विटर हँडलवरुन गुजरात विधानसभा निवडणुकांबाबतचे अंदाज व्यक्त केले आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होत असून पहिल्या टप्प्याचं मतदान 9 तारखेला झालं, तर उद्या (14 डिसेंबर रोजी) दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.